CGTMSE

CGTMSE लघु उद्योजकांना मिळणार ५ कोटी पर्यंतचे विनातारण कर्ज..!!

कर्ज कसे मिळवायचे?

क्रेडिट गॅरंटी स्कीम अंतर्गत कर्ज मिळवायचे असेल तर काय करावे हे आपण बघूया

व्यवसायाची नोंदणी करणे:

जर क्रेडिट गॅरंटी स्कीम अंतर्गत कर्ज मिळवायचे असेल, तर सर्वप्रथम कोणता व्यवसाय करणार आहात त्याबद्दल व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

व्यवसायाची योजना तयार करणे:

कोणत्याही बँकेकडून कर्ज घेताना सर्वप्रथम बँक आपल्या व्यवसायाची योजना काय आहे, याबद्दल माहिती मागवते. त्यानुसार बँक आपल्याला कर्ज किती द्यावे व व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे, याबद्दल विचारविनिमय करते. व्यवसाय योजनेमध्ये आपले बिजनेस मॉडेल काय आहे, आपला खर्च किती आहे, आपली कमाई किती होऊ शकते या गोष्टींची माहिती असते.

बँकेत कर्जासाठी अर्ज करावा.

उत्तम व्यवसाय योजना बनवल्यानंतर इच्छुक व पात्र व्यावसायिकांनी बँकेत कर्जासाठी अर्ज करावा. अर्ज करताना बँक ही MSE साठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट सोबत जोडलेली आहे की नाही ते बघावे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची व माहितीची पडताळणी करते आणि त्यानंतर बँकेचे जे धोरण आहे त्यानुसार कर्ज मंजूर करते.

क्रेडिट गॅरंटी कर्ज योजनेअंतर्गत कव्हर मिळवा:

जेव्हा बँकेकडून व्यावसायिकाला कर्ज मंजूर होते. त्यानंतर कर्ज हमीसाठी बँकेकडून व्यावसायिकाच्या वतीने क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत अर्ज केला जातो. त्यानंतर जेव्हा CGTMSE अंतर्गत कर्ज मंजूर होते, तेव्हा कर्जदाराला काही शुल्क भरावे लागते.

क्रेडिट गॅरंटी स्कीम अंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली दिलेय लिंक वर क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top