Police Patil Salary शासन यंत्रणेतील गाव पाटाळीवे महत्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे पोलिस पाटील. गावात शांतता प्रस्थापित कारणे, गावातील तंटे मिटविणे, अशा प्रकारची कामे पोलिस पाटील करत असतात. पोलिस पाटील यांच्या मानधनाबाबत अनेकदा पोलिस पाटील संघटनेच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली. त्याचप्रमाणे अनेक मंत्र्यांना निवेदने देण्यात आली होती.
अखेर शासनाने पोलिस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
Police Patil Salary किती मिळणार मानधन
आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील.
सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये मिळतात. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या पोलीस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे असून मानधनात वाढ केल्यास ३९४ कोटी ९९ लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल. या खर्चासही मान्यता देण्यात आली.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा