Post Office Scheme 2023 नागरिकांसाठी भारतीय पोस्ट ऑफिस विविध प्रकारच्या बचत योजना राबवत असते. कोट्यवधी लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा चांगला फायदा घेतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. यामुळे पोस्ट ऑफिस योजनांचा लाभ घेऊन गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे.
पोस्ट ऑफिस मध्ये पैसे गुंतवणे हे एक जोखीमयुक्त गुंतवणूक मानले जाते. लोकांना वाटते की आपण आपले पैसे सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवावे. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना आहे जी म्हणजे ग्राम सुरक्षा योजना. या योजनेमध्ये रोज पन्नास रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही 35 लाख रुपयांचा परतावा मिळवून शकता.
Post Office Scheme 2023 अशी करा गुंतवणूक:
ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेचा एक भाग म्हणजेच ग्राम सुरक्षा योजना आहे. 1995 मध्ये देशाच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही विमा पॉलिसी सुरू करण्यात आली होती. ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय हे 19 ते 55 वर्षे वयोगटातील असावे.
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार १० हजार रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. या योजनेमध्ये प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक केलेला गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकतो.
असा मिळणार परतावा:
समजा एखाद्या व्यक्तीने ग्रामसुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला १,५१५ रुपये म्हणजेच दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करायची असेल, तर त्या गुंतवणूकदाराला तब्बल 35 लाखांचा परतावा मिळू शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ग्राम सुरक्षा योजना ही वयाच्या 19 व्या वर्षी घेत असेल तर, त्या व्यक्तीला वयाच्या 55 वर्षापर्यंत १५१५ रुपये प्रीमियम भरावा लागेल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Uniform Civil Code जाणून घेऊया समान नागरी कायदा म्हणजे काय….? काय आहेत फायदे….?
- Non Agricultural Land Certificate आता जमिन NA करण्याची गरज नाही
- Flood Damage Insurance पावसाच्या पुरामध्ये गाडी खराब झाली किंवा वाहून गेली तर, भरपाई कशी मिळेल?
- Career After 12th बारावीचा निकाल जाहीर, आता पुढे काय..? जाणून घेऊ या उपलब्ध असलेले विविध कोर्सेस..!!
- PM ShramYogi Mandhan Yojana प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना: काय आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे………!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.