Pre Approved Loan प्रीअप्रुव्हड लोन घेणे किती सुरक्षित आहे?

Pre Approved Loan

Pre Approved Loan अनेकदा बँकेकडून ग्राहकांना पूर्व मंजूर कर्ज घेण्यासाठी ऑफर येत असतात. आर्थिक गरज असताना अशी ऑफर मिळत असेल ,तर ते तुमच्या फायद्याचे ठरते. तुमची त्या वेळेत असणारी आर्थिक गरज पूर्ण होणार असते.

बँकांना हवे कर्जदार:

आर्थिक व्यवहार न चुकता वेळेवर करणाऱ्या, आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या, तसेच ज्या ग्राहकांचे बँक व्यवहार चांगले आहेत, अशा ग्राहकांना बँका अशी कर्जे देतात.

ज्या प्रकारे बँकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढते आहे, त्या प्रमाणात बँकांकडून पूर्व मंजूर कर्ज देण्याचे प्रमाण वाढले आहे.

हे वाचले का?  Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!

Pre Approved Loan कोणाला मिळते प्रीअप्रुव्हड लोन?

ज्या ग्राहकांचा आर्थिक इतिहास बँकांना माहिती असतो, अशा ग्राहकांनाच पूर्व मंजूर कर्ज प्रस्तावित केले जाते. बँक जारी स्वत: प्रस्ताव देत असेल तरी सुद्धा काही अतिरिक्त कागदपत्रे बँक ग्राहकांकडून मागवते.

उत्पन्नाचा पुरावा आणि आयटीआर यांचा या कागदपत्रांमध्ये समावेश असतो. कर्ज परतफेडीची क्षमता त्यातून तपासली जाते. ग्राहक मिळावे म्हणून बँक सातत्याने प्रयत्न करत असते.

सावधान हे माहीत नसेल तर घर जमिन संपत्ती तुमची राहणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय Adverse Possession

प्रीअप्रुव्हड लोन(Pre Approved Loan)चे फायदे:

प्रीअप्रुव्हड लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला बँकेत चकरा माराव्या लागत नाही.

त्याचप्रमाणे कागदपत्रांची औपचारिकता ही पूर्ण कराव लागत नाही.

हे वाचले का?  Unnecessary loan consequences गरज नसताना कर्ज मिळतंय? थांबा ! हे आहे गरज नसताना घेतलेल्या कर्जाचे धोके !

व्याजदर तसेच अटी शर्ती बाबत वाटाघाटी करण्याची संधी ग्राहकांकडे असते.

या प्रकारचे कर्ज ग्राहकाने नाकारले तरी ग्राहकाच्या क्रेडिट स्कोर वर याचा परिणाम होत नाही.

तुम्ही कधी होणार कर्जासाठी पात्र?

कर्जासाठी पहिली पात्रता कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर ही आहे.

क्रेडिट स्कोर सुधारायचा असेल तर तुम्ही घेतलेले कर्ज आणि त्याचे हप्ते वेळेत फेडा.

जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा कर्जाचा इतिहास नसेल तर बँक त्या व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन आणि बचत याबाबतची माहिती घेते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top