कर्ज लगेच हवे आहे..? तर हे काम नक्की करा | Instant Loan |

Instant Loan

Instant Loan कर्जदार आणि कर्ज देणाऱ्या संस्था यांच्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे सीबील स्कोर. जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सीबील स्कोर उत्तम असेल तर कर्ज देण्यासाठी मागे लागतात.

परंतु जर सीबील स्कोर चांगला नसेल तर कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होतात.

तुम्ही घेतलेली कर्ज आणि त्या कर्जाची केलेली परतफेड याच्या आधारे सीबील स्कोर काढला जातो. एखाद्या व्यक्तिला किती कर्ज मिळेल हे त्या व्यक्तीच्या सीबील स्कोर वरुण ठरवले जाते.

जर सीबील स्कोर चांगला असेल तर कमी व्याज दरावर मोठी रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.

एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळा:

शक्यतो एक वेळी एक किंवा दोन च कर्जे घ्यावी. त्यापेक्षा अधिक कर्ज घेऊ नये.

हे वाचले का?  12th exam time table change बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

जर तुम्ही काढलेले कर्ज मोठे असेल तर तुमच्या इतर खर्चावर ताण येऊ शकतो. काढलेल्या कर्जाची परतफेड झाल्याशिवाय दुसरे कर्ज घेऊ नये.

सुरक्षित कर्ज काढा:

तुमच्या क्रेडिट कार्ड च्या बिलाचे रूपांतर ईएमआय मध्ये केले असेल किंवा तुमच्या आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्ज काढले असेल, तर इतर कोणतेही वैयक्तिक कर्ज काढू नका.

याला पर्याय म्हणून तुम्ही गोल्ड लोन घेऊ शकता. हा एक कर्जासाठीच सुरक्षित पर्याय आहे.

यामुळे तुमच्या सीबील स्कोर वर कोणताही परिणाम होणार नाही.

पूर्ण क्रेडिट लिमिट वापरू नका:

प्रत्येक क्रेडिट कार्ड वर खर्चाची मर्यादा ही ठरवून दिलेली असते. तमचे इन्कम किती आहे यावर क्रेडिट कार्ड ची मर्यादा ठरवली जाते.

तुम्हाला दिलेल्या क्रेडिट कार्ड चा वापर करताना पूर्ण लिमिट पर्यंत रक्कम वापरू नका.

हे वाचले का?  Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.

तुमच्या सीबील स्कोर ची सतत पडताळणी करत राहा:

बऱ्याचदा लोकांना सीबील स्कोर बद्दल माहिती ही ज्या वेळी ते कर घेण्यासाठी अर्ज करतात त्यावेळी समजतो.

ज्यावेळी कर्जाची परतफेड केली जाते त्यावेळी स्कोर मध्ये सुधारणा होते. काही वेळेला स्कोर अपडेट करायचे राहून जाते.

जर तुम्हाला स्कोर बद्दल काही शंका असेल तर तुम्ही कर्ज घेतलेल्या बँके सोबत संपर्क करता येतो.

सीबील स्कोर बद्दल बँकेत सतत पडताळणी करत रहावे.

ईएमआय च्या बाबतीत सतर्क राहावे:

जर तुम्हाला तुमचा सीबील स्कोर चांगला ठेवायचा असेल तर ईएमआय वेळेवर भरावा लागेल. काही कारणामुळे बऱ्याचदा जवळ पैसा असून पण ईएमआय भरला जात नाही. ईएमआय वेळेवर भरला नाही तर त्याचा परिणाम स्कोर वर होतो.

हे वाचले का?  Children Vaccination मुलांच्या लसीकरणाचे सुद्धा मिळेल मोबाइल वर रिमायंडर | ऑगस्ट पासून येणार ॲप |

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top