Property Vatani ‘प्रॉपर्टीची वाटणी’ करण्यासाठी कायदेशीर पर्याय…

  1. तहसीलदार :

सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 नुसार वाटप हे वाटप तहसीलदारांसमोर केले जाते. वाटप पत्राचा दस्त हा सर्व हिस्सेदारांमध्ये नोंद करण्यासाठी तहसीलदाराकडे यासाठीचा अर्ज दाखल करावा लागतो.

मात्र हा अर्ज तहसीलदार हिष्यातील सर्व व्यक्ती वाटपास तयार असल्यासच देतात, अर्जामध्ये सांगितल्याप्रमाणे वाटण्या करून घेण्यास तयार आहोत असे तहसीलदारास सांगावे लागते तरच या वाटण्या होतात.

2. रजिस्टरार ऑफिस :

सर्वात जास्त वापरला जाणारा हा पर्याय वाटप पत्राचा असून हा रजिस्टर ऑफिसला रजिस्टर करून घेणे आवश्यक असते. यामुळे पुढचे कायदेशीर होणारे वाद टाळले जातात. प्रत्येकाच्या क्षेत्राच्या चतुसीमा ठरवून एकमेकांचे हिस्से ठरवले जातात आणि त्याप्रमाणे वाटप पत्राचा दस्त रजिस्टरार ऑफिसमध्ये नोंदवला जातो.

जेव्हा दस्त नोंदणी करायचा असतो तेव्हा सर्व सभासदांची संमती असणे आवश्यक असते. एखादा हिस्सेदार सहमत नसेल तर तो दस्त नोंदवता येत नाही.

3. दिवानी दावा :

नाईलाजास्तव स्वीकार करण्यात येणारा मार्ग म्हणजे दिवानी दावा. या दाव्यामध्ये वाटपाचा दावा निकाली निघून वाटप हे सरकार ज्या पद्धतीने सांगेल तसे होते. यासाठी किती वेळ किंवा कालावधी लागेल हे सांगता येत नाही.

हा दावा जेव्हा एखादा सह हिस्सेदार वाटप करण्यास नकार देतो, तेव्हा केला जातो. या दाव्यामुळे वेळ व पैसे जातात, पण हे वाटप कोर्टामार्फत होत असल्यामुळे कायदेशीर रित्या परिणामकारक वाटप होते,

दिवानी दाव्यामध्ये जो व्यक्ती वाटणी करण्यास नकार देत आहे त्याला कोर्टाकडून एक नोटीस जाते, ही कारणे दाखवा नोटीस त्या व्यक्तीस दिलेल्या तारखेस कोर्टात हजर राहून त्याने योग्य ते कारण, आणि या वाटणीस का मनाई करत आहे याचे कारण द्यायचे असते. यासाठी प्रतिवादीने कोर्टासमोर पुरावे देखील सादर करावे लागतात. तसेच दोन्ही पक्षांचे साक्षीदार तपासले जातात.

या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कोर्ट योग्य तो न्यायनिवाडा देते यालाच कोर्टाच्या भाषेत डिक्री असे म्हणतात, या डिक्री च्या साह्याने कोर्टामध्ये दारखास्त दाखल करावी लागते.

तर हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्स द्वारे कळवा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top