Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात.

याअंतर्गतच फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.

फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. फलोत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत विशेष लेख…

काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमान निहाय मिळणारे अनुदान येथे पहा

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan काढणीत्तोर व्यवस्थापन

फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते.

हे वाचले का?  "तौक्ते" चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत जाहीर

उत्पादित फलोत्पादन, औषधी , सुगंधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजार मुल्य ‍शेतकऱ्यांना कमी मिळते.

या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी इ. प्रकल्पांना प्रेात्साहन व अर्थसहाय्य दिले जाते.

अर्ज कुठे करावा?

उद्देश  :-

  • मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या फलोत्पादन उत्पादनाचे बाजार नियंत्रण करणे.
  • फलोत्पादित, औषधी व सुगंधी वनस्पती पिकांचा दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे.
  • बाजारपेठेमध्ये फलोत्पादित औषधी व सुगंधी वनस्पतींच्या पुरवठयात सातत्य ठेवणे.
  • ग्राहकाला आवडीप्रमाणे सातत्याने चांगल्या दर्जाच्या मालाचा पुरवठा करणे.
  • फलोत्पादित, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाऊपणा वाढविणे.

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan पात्र लाभार्थी :-

काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमान निहाय मिळणारे अनुदान येथे पहा

  • शेतकरी, 
  • शेतकरी उत्पादक गट, 
  • भागीदारी संस्था, 
  • मालकी संस्था, 
  • नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, 
  • नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), 
  • शेतकरी उत्पादक कंपनी, 
  • कंपनी, 
  • महानगरपालिका, 
  • सहकारी संस्था, 
  • सहकारी मार्केटिंग फेडरेशन, 
  • लोकल बॉडी, 
  • कृषि उत्पन्न बाजार समिती, 
  • पणन मंडळ, 
  • शासकीय विभाग, 
  • ग्रामपंचायत.
  • शेतकरी उत्पादक कंपनी,
  • शेतकरी उत्पादक संस्था, 
  • शासन मान्य संस्था, 
  • सहकारी संस्था
हे वाचले का?  Magel Tyala shettale मागेल त्याला शेततळे योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती

अर्ज कुठे करावा?

वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.

हे वाचले का?  शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ

तसेच त्यांना प्रकल्प किमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबाबत चे पुरावे सादर करावे लागतील.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top