Low Sand Rates वाळू वाहतुकीचे नियम
- नवीन वाळू धोरणानुसार वाळू वाहतुकीसाठी पुढील नियम सांगितले आहेत:
- वाळू गटातून वाळू डेपोपर्यंत वाळूची वाहतूक ट्रॅक्टर किंवा सहा टायरच्या टिप्पर या वाहनांनी करणे बंधनकारक आहे.
- वाळू गटापासून वाळू डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि टिप्पर या वाहनांची संख्या आणि त्यांचे क्रमांक यांची नोंदणी करावी.
- या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांनी वाळू वाहतूक केल्याचे आढळल्यास निविदा तारकावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- वाळू गटातून वाळू डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक राही.
- सदर वाहनांना वाळू डेपो वगळता इतरत्र वाळूची वाहतूक केल्यास ते वाहन जप्त करून कारवाई केली जाईल.
- वाळू पुरवठ्यांसाठी सध्या तरी तालुक्याच्या ठिकाणी डेपो तयार करण्यात येत आहेत. त्या त्या भागातील वाळूची मागणी लक्षात घेऊन डेपोची निर्मिती केली जाऊ शकते.
सध्या राज्य सरकार एक वर्ष प्रायोगिक तत्त्वावर हे धोरण अवलंबणार आहे. अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच त्यातल्या त्रुटी लक्षात येतील आणि मग त्यात सुधारणा केल्या जातील.
वाहतुकीचा खर्च
शासनाच्या डेपोतून प्रतिब्रास ६०० रुपये दराने वाळू मिळणार असली तरी या वाळूवर जीएसटी लागणार का आणि गौण खनिज कर आकारला जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय ट्रॅक्टर भर वाळूच्या एका ट्रिप साठी जाऊन येऊन दहा किलोमीटर अंतरासाठी जवळपास एक हजार रुपये वाहतूक खर्च आकारला जातो. किती अंतरावर वाळू वाहतूक करायची त्यानुसार हा दर कमी जास्त होत असेल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!
- Adhar Card loan काही मिनिटात मिळवा आधार कार्ड वरती लोन….
- Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?
- Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….
- Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन