Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?

Title Clear Property

Title Clear Property मित्रांनो रोजच्या नवनवीन प्रकारच्या माहितीप्रमाणेच आज सुद्धा आम्ही तुम्हाला एका नवीन विषयावर माहिती घेऊन आलेलो आहोत. ती माहिती म्हणजे क्लिअर टायटल जमीन.

‘ही कागदपत्रा सांगतात ‘टायटल क्लिअर’ जमीन आहे की नाही ?

मित्रांनो काही लोक म्हणत असतात की क्लिअर टायटल जमीन आहे. तर क्लिअर टायटल जमीन म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आजचा हा लेख संपूर्ण वाचा.

Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन

Title Clear Property एखादी प्रॉपर्टी म्हणजेच प्लॉट, फ्लॅट, जमीन किंवा एखादी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी जेव्हा आपण जात असतो तेव्हा आपल्याला ते जमीन विकणारे किंवा एजंट यांचे कडून असे सांगितलेले जाते की ही प्रॉपर्टी चे टायटल क्लियर आहे. ही जमीन घेताना किंवा प्रॉपर्टी घेताना आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही.

एक तर आपण पहिल्यांदाच प्रॉपर्टी घ्यायला जाणार असतो त्यात आपल्याला माहिती नसते की क्लियर टायटल जमीन म्हणजे काय. आपल्याला वाटतं की ही जमीन किंवा प्रॉपर्टी ही व्यवहारासाठी योग्य आहे असा आपल्याला गैरसमज होतो आणि याच गोष्टीवर विश्वास ठेवून आपण व्यवहार करून बसतो,

हे वाचले का?  विहीर सोलर पंप अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार सहा लाख अनुदान.

आणि पुढे काहीतरी घोटाळा झाल्यास आपण फसतो, आणि नंतर आपल्याला कोर्टकचेरा करत बसत कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, पैसाही जातो आणि मनस्ताप ही होतो.

‘ही कागदपत्रे सांगतात ‘टायटल क्लिअर’ जमीन आहे की नाही ?

यासाठीच हा लेख आम्ही आज लिहिलेला आहे. आज आपण समजून घेऊ की टायटल क्लियर म्हणजे काय? या टायटल क्लिअर मधील टायटल या शब्दाचा अर्थ काय? आणि क्लिअर या शब्दाचा अर्थ काय?

मित्रांनो टायटल म्हणजे मालकी हक्क आणि क्लियर म्हणजे या हक्कावर कुठलाही वाद नाही. किंवा कोर्टात कोणत्याही प्रकारचा दावा दाखल नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे शासकीय निर्बंध किंवा कुठल्याही अडीअडचणी, बंधनात किंवा कायदेशीर प्रोसेसमध्ये ही मालकी हक्क असलेली जमीन फसलेली किंवा अडकलेली नाही यालाच क्लियर असणे असे म्हणतात.

या सर्वांचा विचार करून टायटल क्लिअर म्हणजे काय? तर मालकी हक्क कुठल्याही वादात नाही असं याचा अर्थ होतो. आता प्रश्न असा राहिला की मालकी हक्क कुठल्याही वादात नाही हे जरी खरं असेल तरी जमिनीचा किंवा प्रॉफिटचा व्यवहार करण्यासाठी हे कारण पुरेसं आहे का?

हे वाचले का?  Death Will /मृत्युपत्र म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!

तर तर अजिबात नाही मुळात खूप लोकांना असं वाटत असते की सातबारा वर नाव आहे म्हणजे मालकी हक्क आहे. मात्र खरं तर असे आहे की सातबारावर ज्याचे नाव असते तो मालक आहे असे नाही. तसेच सातबारा वर नाव असलेला माणूस हा त्या प्रॉपर्टीचा एकटाच मालक आहे असेही नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे

ज्या व्यक्तीचे नाव सातबारावर आहे तो मालक नसतो, तसेच ज्या व्यक्तीचे नाव सातबारावर नाही तो मालक असू शकतो. थोडक्यात सातबारा हे टायटल चे डॉक्युमेंट नसते. सातबारा हा फक्त महसूल विभागाचा एक प्रकारचा दस्तऐवज आहे. तर मग प्रश्न असा आहे की टायटल चे डॉक्युमेंट कुठले मालकी हक्काचे डॉक्युमेंट कुठले तर याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली पाहू.

‘ही कागदपत्रे सांगतात ‘टायटल क्लिअर’ जमीन आहे की नाही ?

हे वाचले का?  10 वी १२ वी परीक्षा होणार ऑफलाइन

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top