श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन

श्रावणबाळ योजना
श्रावणबाळ योजना
श्रावणबाळ योजना

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील निर्णय दिनांक ३०.०९.२००८ अन्वये श्रावणबाळ सेवा योजनेचे नाव श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असे बदलण्यात आले श्रावणबाळ सेवा योजनेसाठीचे निकष, अनुदान याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

श्रावणबाळ योजना पात्रतेचे निकष

१. वय ६५ वर्ष व ६५ वर्षांवरील निराधार स्त्री पुरुष

२. किमान १५ वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

३. कुटूंबाचं नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील यादीत नाही परंतू त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- रु. च्या जात आहे. अशा लाभार्थ्यांना सदर योजनेत लाभ देण्याचा निर्णय दिनांक २९ जून २००९ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने घेतला आहे.

श्रावणबाळ योजना अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे

१. वयाचा दाखला ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या जन्म नोंदवहीतील उता-याची साक्षांकरिता प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या व्याबाबतचा उतारा, शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला वयाचा दाखला.

हे वाचले का?  Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज

२. रहिवासी दाखला ग्रामसेवक / तलाठी /मंडळ निरीक्षक नायब तहसिलदार किंवा तहसिलदार यांनी रहिवासी असल्याबाबत दिलेला दाखला.

श्रावणबाळ योजना मिळणारे अनुदान :

पात्र लाभार्थींना या योजने अंतर्गत दरमहा रु. ४००/- प्रति व्यक्ती इतके अर्थसहाय्य या राज्य योजनेतून दिले जाते व याच लाभ धारकांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली रु.२००/- असे प्रति एकूण मंजूर रु. ६००/- अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे..

श्रावणबाळ योजना पात्र व्यक्तीचे प्रकार :

किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेले व ६५ वर्षावरील व्यक्ती या नियमानुसार आर्थिक मदत मंजूर करण्यास पात्र राहिल.

नव-नवीन माहिती

अर्ज करण्याची पद्धत

१. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळण्यासाठी विहित नमुन्यामधील अर्जाचा दोन प्रती अर्जदार ज्या भागात रहात असेल त्या भागाच्या संबंधीत तलाठयाकडे अर्ज सादर करील. तलाठी सदर अर्जदारास पोच देईल त्यानंतर प्राप्त अर्जाची व त्या सोबतच्या कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज संबंधीत तलाठी यांनी तहसिलदार / नायब तहसिलदार यांचेकडे पाठवावेत.

हे वाचले का?  Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!

संबंधीत तहसिलदार अथवा नायब तहसिलदार यांच्याकडे आलेले अर्ज प्राप्त तारखेनुसार लावण्यात यावेत व याची एका नोंदवहीत नोंदणी क्रमांकासह नोंद घेण्यात यावी.

आलेल्या अर्जाची छाननी करुन नायब तहसिलदार / तहसिलदार यांनी सदर अर्ज तालुकास्तरावरील विधानसभा

३. सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर मान्यतेस्तव दर तीन महिन्यात ठेवावीत. ४. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी समितीने करावी व छाननी नंतर लाभार्थ्यांची निवड समितीने करावी अशी निवड झाल्यानंतर पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सूचना फलकावर लावण्यात यावी.

५. अर्ज मंजूर लाभार्थ्यांना कळवावे व ज्यांचे अर्ज नामंजूर झाले अशा अपात्र लाभार्थ्यांना कारणासह कळवावे. सदर लाभाथ्यांची यादी ग्रामसभा, प्रभाग संस्थेला माहितीसाठी पाठवावी. तसेच पात्र व अपात्र अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीच्या व प्रभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात यावी.

सदर यादीचे वाचन ग्रामसभेत व प्रभाग कार्यालयात करावे. ग्रामसभेने व प्रभाग कार्यालयाने काही व्यक्तीची चुकीची निवड झाली आहे असे पुराव्यासह कळविल्यास असे अर्ज पडताळणी करून समिती समोर फेरविचारार्थ ठेवावेत.

हे वाचले का?  शेती कुंपण योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग उभारणीची योजना.

दिनांक ३० सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये सामावून घेण्यात येते.

तसेच दिनांक ३० सप्टेंबर २००८ पर्यत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांची नावे दारिद्रय रेषेखालील यादीत नसल्याचा त्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कमी करता येणार नाही. अथवा त्यांचा लाभ बंद करता येणार नाही..

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक कारा

व्हिडिओ  पाहन्यायासाठी  येथे क्लिक करा

1 thought on “श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन”

  1. Pingback: ONGC Recruitment अप्रेंटिस पदासाठी ओएनजीसी मोठी भरती - naukri

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top