राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay)

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना ची सुरुवात केंद्र शासनाच्या १४ नोव्हेंबर १९९५ च्या शासन निर्णयानुसार झाली.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना निकष

  • राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेत कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात ज्याच्या उत्पन्नाचा वाटा मोठा असेल अशा प्रमुख कमावत्या स्त्री / पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळेल.
  • कुटुंबातील मृत्यू पावलेल्या कमावत्या स्त्री / पुरुषाचे वय १८ ते ६४ वर्ष या वय मर्यादेत असावे.
  • लाभ घेणारे कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे.
  • या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री / पुरुषाच्या विधुरास/ विधवेस, अज्ञान मुलांना अविवाहित मुलींना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांना मिळेल. तसेच अविवाहित प्रौढांचे अज्ञान भाऊ बहीण यांना लाभ मिळेल.
  • राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे लाभार्थी मंजूर करण्याचे अधिकार २३/०६/१९९८ च्या शासन निर्णयानुसार संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांना देण्यात आले आहेत.
  • सदर योजनेचा लाभ देताना सर्पदंशामुळे व आत्महत्येमुळे घडलेले मृत्यू देखील अनैसर्गिक मृत्यू म्हणून ग्राह्य धरुन संबंधीत लाभ देण्याबाबत १२/०६/१९९८ च्या शासनाच्या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे.
  • ३१ ऑगस्ट १९९८ च्या शासन निर्णयानुसार दारिद्रय रेषेखालील कुटुंब प्रमुख कमावती स्त्री अथवा पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या लाभार्थी कुटुंबास २०,०००/- रु. लाभ मंजूर करावा. व मयत व्यक्ती ही कुटुंबातील आर्थिक उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा असणारी व्यक्ती असावी.
  • सदर योजनेचा अर्ज मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यापासून एक वर्षाच्या आत तहसील कार्यालयात सादर केलेला असावा.
  • लाभ घेणारे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली असावे व मयत व्यक्तीचे नावे कुटुंब प्रमुख म्हणून दारिद्र्य रेषेचे गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र दिलेले असावे.
  • लाभ घेणा-या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५,०००/- रु. च्या आत असावे.
हे वाचले का?  Vidhwa Pension Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत विधवा महिलांना मिळणार दरमहा 600 रुपये | पहा आवश्यक कागदपत्रे | अर्ज कुठे करावा |

नवनवीन माहिती

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज मंजूर करण्याची पद्धत

  • दारिद्रय रेषेखालील यादीत नाव असलेल्या एखाद्या कमावत्या १८ ते ६४ वयोगटातील कमावत्या स्त्री / पुरुषाचा मृत्यू झाल्यास मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत मयताच्या पत्नीने / पतीने अर्ज केला पाहीजे.
  • अर्जासोबत अर्जदाराने तलाठी / मंडळ अधिकारी यांचे १५,०००/- रु. चे त्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे.
  • मयताचे नाव दारिद्रय रेषेखालील गटविकास अधिका-याचे प्रमाणपत्र असावे.
  • मयताचे वयाबाबत पुरावा मतदानाचे ओळखपत्र / मतदार यादीतील प्रत/ ची साक्षांकित प्रत
  • रहिवाशी बाबत शिधापत्रिका / लाईट बोल / घरपट्टी जोडावी.
  • मयत व्यक्ती मृत्यू पावल्या बाबतचे ग्रामसेवक / मुख्याधिकारी यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र जोडलेले असावे.
  • लाभार्थी अर्जासोबत शपथपत्र जोडावे
  • लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर करताना मयताचे नाव दारिद्रय रेषेखालील यादीत आहे काय? याबाबत मंजूर करणा-या अधिकारी यांनी मूळ यादी तपासून घ्यावी तसेच मयताचे मृत्यूची नोंद असलेले मूळ अभिलेख सुद्धा तपासून घेतल्यानंतरच अर्ज मंजूर करावा.
  • अर्ज मंजूर केल्यानंतर लाभार्थ्यास १०,०००/- रु. ची रक्कम धनादेशाच्या स्वरुपात देण्यात यावी व लाभ देताना संबंधीत तलाठी / ग्रामसेवेका समक्ष धनादेश देण्यात यावा.
हे वाचले का?  मोदी सरकारची महिलांसाठी नवी योजना | scheme for women |महिला बचत गटांना मिळणार ड्रोन |

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top