Tax Saving Schemes या आहेत कर वाचवणार्‍या आणि उत्तम रिटर्न मिळवून देणाऱ्या योजना

Tax Saving Schemes

Tax Saving Schemes नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले की गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक असते. नाहीतर वर्षाच्या शेवटी मोठी कपात होऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीलाच योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर आयकर कपात कमी होईल आणि परतावा देखील चांगला मिळतो. अशा दुहेरी लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत याची माहिती बघूया.

Tax Saving Schemes या आहेत कर वाचवणार्‍या आणि रिटर्न देणाऱ्या योजना:

  • इक्विटी म्यूचुअल फंड: इक्विटी म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला बाजारातील वाढीचा फायदा होतो. यामुळे तुमच्या गुंतवणुकीचा मूल्य वाढतो आणि तुम्हाला नफा होतो. इक्विटी म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणुकीवर दीर्घकालीन कर सवलत मिळते.
  • नॅशनल पेन्शन सिस्टम(NPS): NPS ही एक बचत योजना आहे जी तुम्हाला वृद्धापकाळासाठी आर्थिक सुरक्षितता प्रदान करते. NPS मध्ये गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. कलम 80 सी अंतर्गत मिळणारी 1.5 लाख रूपायांपर्यंतच्या वजावटी व्यतिरिक्त 50 हजार रुपयांपर्यंत लाभ घेत येतो.
  • सुकन्या समृद्धी योजना(SSY): SSY ही एक बचत योजना आहे जी मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक मदत प्रदान करते. SSY मध्ये गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. तुमच्या मुलीच्या नावाने तुम्ही कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते.
  • इन्शुरन्स प्लॅन्स: विमा योजनांमध्ये गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. विमा योजना तुम्हाला विविध प्रकारच्या विमा संरक्षणासह उत्पन्नाची हमी देतात.
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना: ही एक ज्येष्ठ नागरिकांसाठी ची बचत योजना आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक 1 हजार रुपयांपासून 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. जमा रकमेवर 8.2% दराने या योजनेतील व्याज मिळते.
  • पीपीएफ: Public Provident Fund म्हणजेच PPF ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. उत्तम परतव्याची हमी देखील मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक चांगली योजना आहे. गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वतेनंतर जि रक्कम मिळते ती रक्कम पूर्ण करमुक्त असते.
हे वाचले का?  ITR Return फाइल करताय..? मग ही काळजी अवश्य घ्या |

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top