Types Of Insurance जाणून घेऊ या विमा म्हणजे काय? हे आहेत विम्याचे प्रकार आणि फायदे ….!

Types Of Insurance

Types Of Insurance मित्रांनो आज आपण इन्शुरन्स म्हणजेच विमा म्हणजे काय? त्याचे किती प्रकार असतात? आणि फायदे काय काय आहेत? हे पाहणार आहोत. हे सर्व माहिती पूर्ण वाचा, व कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

विमा प्रकार येथे पहा

Types Of Insurance विमा म्हणजे काय ?

विमा म्हणजे एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये कोणतीही एक विमा कंपनी आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान आजार अपघात किंवा मृत्यूच्या नुकसान भरपाईची हमी देते.

विमा कंपनी ही प्रत्येक दुःखद घटनेनंतर मदत करत असते, म्हणून प्रत्येकासाठी विमा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या या धकाधकीच्या आणि गर्दीच्या जीवनामध्ये कधी काय घडेल याची कोणालाही काहीही माहिती नाही.

हे वाचले का?  शेतरस्ते गाडीरस्ते मोकळे होणार शेतावर जाण्याचे पायमार्ग गाव नकाशाप्रमाणे शिवाररस्ते अतिक्रमित व बंद झालेले पाणंद रस्ते

अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या मौल्यवान वस्तूंचा विमा योग्यरीत्या केलेला असेल तर, तो आपल्यासाठी बॅकअप मदतीसारखे कार्य करू शकतो.

विमा प्रकार येथे पहा

Types Of Insurance विम्याचे प्रकार:

1. जीवन विमा योजना म्हणजे काय आणि त्याचे फायदे (Life insurance policy)

जीवन विमा योजनेमध्ये किंवा लाइफ इन्शुरन्स मध्ये निर्दिष्ट मूल्य (Specified Amount) जमा करून पॉलिसीधारकाचा जर मृत्यू झाला तर, पॉलिसीच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार पॉलिसीचे पैसे दिले जातात.

ही पॉलिसी खास करून आपल्या कुटुंबासाठी काही लोक खरेदी करतात. कारण, कधी काय घडेल याची काहीही शाश्वती नाही. जीवनावर कोणाचाही विश्वास नाही म्हणून ही पॉलिसी अवलंबली जाते.

जेणेकरून घरातील एखादी मुख्य व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला पैशांच्या बाबतीमध्ये काहीतरी मदत मिळेल.

विमा प्रकार येथे पहा

2. अपघात विमा योजना (Personal accident Insurance)

या पॉलिसीमध्ये पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार पॉलिसी धारकाचा अपघात झाल्यास किंवा पॉलिसीधारकास दुखापत झाल्यास, अपघात विमा योजना किंवा अपघाती पॉलिसीमध्ये स्पेसिफाईड अमाऊंट जमा करून रुग्णालयाच्या खर्चासाठी किंवा मृत झाल्यावर ही रक्कम पॉलिसीधारकास दिली जाते .

हे वाचले का?  Land Ceiling Act तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते?

अपघाती विमा पॉलिसी चा सर्वात मोठा फायदा असा आहे की, अपघात झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही.

विमा पॉलिसी कंपनी सर्व खर्च करते मात्र वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये वेगवेगळ्या अटी व शर्ती असतात ज्या आपण वाचल्या पाहिजेत आणि त्या वाचूनच कोणती पॉलिसी घ्यावी हे ठरवले पाहिजे.

विमा प्रकार येथे पहा

3. वैद्यकीय आणि आरोग्य विमा योजना (Medical and Health Insurance)

वैद्यकीय आणि आरोग्य विमा मध्ये आपण पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व बाबींसाठी एक निश्चित रक्कम देऊन अनेक फायदे मिळवू शकतो, जसे की आजारी असल्यास रुग्णालयामध्ये प्रवेश देवू शकतो तसेच औषधे आणि ऑपरेशनचा खर्च हा विमा कंपनीत भरते.

ही पॉलिसी खूप महत्त्वाची आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य हे खराब होतच राहत असते, अशा परिस्थितीमध्ये या पॉलिसी कंपन्या वर्षामध्ये काही नियमित आरोग्य चेक-अपचा खर्च देखील करतात.

हे वाचले का?  पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार

आजकालच्या अनियमित आणि अशुद्ध खाण्या पिण्यामुळे तसेच आसपासच्या वातावरणामुळे तब्येत कशी राहील याची शाश्वती नसते अशा परिस्थितीमध्ये आरोग्य विमा पॉलिसी खूपच उपयुक्त ठरते .

विमा प्रकार येथे पहा

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top