केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांअतर्गत अभिप्रेत असलेला सर्व कारभार संगणकीकृत करुन एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध आवश्यक असलेले सेवा दाखले, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त प्रकारच्या बँकिंग सेवा ग्रामीण जनतेला एकाच ठिकाणी “आपले सरकार सेवा केंद्र” ( Aaple Sarkar Seva Kendra) प्रकल्प राबविण्याचा निर्णय दि. ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.
आपले सरकार सेवा केंद्र चालका मार्गदर्शक सुचना:
- आपले सरकार सेवा केंद्र चालक हे गावपातळीवरील उद्योजक आहेत, ते शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या सेवेत नाहीत.
- केंद्रचालकांनी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे संगणकीकरण करणे, ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे दाखले / प्रमाणपत्र संगणकीकृत करणे व वितरीत करणे व ग्रामपंचायतींशी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी इतर संगणकीकृत सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
- केंद्रचालक त्यांची कामे योग्य प्रकारे करतात किंवा कसे हे पाहण्याची जवाबदारी संबंधित ग्रामसेवक / गटविकास अधिकारी / उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रचालकांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा.
- सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. हे आपले सरकार सेवा केंद्राच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी जबाबदार असतील.
- केंद्र चालकांच्या कामाबाबत काही तक्रारी उदभवल्यास त्यांचे प्राथमिक निराकरण ग्रामपंचायत स्तरावर करावे. तसेच केंद्रचालकांच्या कामाच्या तक्रारींच्या अनुषंगाने सीएससी-एसपीव्ही कंपनीच्या संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापकांना कळविण्यात यावे.
आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या कामाबाबत खाजगी व्यक्ती/संस्थेची तक्रार
- केंद्र चालकांच्या कामाबाबत केलेल्या तक्रारीचे प्राथमिक निराकरण ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावे.
- संबंधित ग्रामसेवक यांनी तक्रारदाराचे व केंद्रचालकाचे म्हणणे ऐकून त्याबाबत शहानिशा करून त्यावर निर्णय द्यावा. सदर प्रक्रिया तक्रारी प्राप्त झाल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत पूर्ण करावी.
- ग्रामसेवकांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुध्द तक्रारदार किंवा केंद्रचालक ७ दिवसांच्या आत संबंधित गट विकास अधिकारी यांचेकडे प्रथम अपील करु शकेल. ग्रामसेवक यांनी त्यांच्या निर्णयामध्ये अपीलाच्या तरतुदीचा स्पष्ट उल्लेख करावा.
- संबंधित गटविकास अधिकारी यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेल्या अपीलावर ३० दिवसांच्या आत निर्णय द्यावा.
- गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुध्द तक्रारदार किंवा केंद्रचालक ७ दिवसांच्या आत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांचेकडे द्वितीय अपील करु शकतील, गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या निर्णयामध्ये अपीलाच्या तरतुदीचा स्पष्ट उल्लेख करावा.
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेल्या अपीलावर ३० दिवसांच्या आत निर्णय द्यावा. सदर निर्णय संबंधितांवर बंधकारक राहिल.
- ऋ) द्वितीय सुनावणीचा अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित केंद्रचालकाला कामावरुन कमी करण्यात येऊ नये.
केंद्र चालकांच्या कामाबाबत सरपंच/ग्रामसेवक यांची तक्रार –
- केंद्र चालकांच्या कामाबाबत केलेल्या तक्रारीचे प्राथमिक निराकरण गटविकास अधिकारी, पंचायती समिती यांचे स्तरावर करण्यात यावे.
- केवळ ग्रामसभा व मासिक सभेच्या ठरावाच्या आधारे केंद्रचालकांना कामावरुन कमी न करता संबंधित गटविकास अधिकारी यांनी तक्रारदाराचे व केंद्रचालकाचे म्हणणे ऐकून त्याबाबत शहानिशा करुन त्यावर निर्णय द्यावा. सदर प्रक्रिया तक्रारी प्राप्त झाल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत पूर्ण करावी.
- गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुध्द तक्रारदार किंवा केंद्रचालक ७ दिवसांच्या आत संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांचेकडे प्रथम अपील करु शकेल. गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या निर्णयामध्ये अपीलाच्या तरतुदीचा स्पष्ट उल्लेख करावा.
- संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेल्या अपीलावर ३० दिवसांच्या आत निर्णय द्यावा.
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुध्द तक्रारदार किंवा केंद्रचालक ७ दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे द्वितीय अपील करु शकतील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी त्यांच्या निर्णयामध्ये अपीलाच्या तरतुदीचा स्पष्ट उल्लेख करावा.
- मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेल्या अपीलावर ३० दिवसांच्या आत निर्णय द्यावा. सदर निर्णय संबंधितांवर बंधकारक राहिल. ऋ) द्वितीय सुनावणीचा अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित केंद्रचालकाला कामावरुन कमी करण्यात येऊ नये.
संबंधित ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केंद्र चालकांच्या विरुध्द आलेल्या तक्रारीचे स्वरूप विचारात घेऊन पारदर्शक पध्दतीने तक्रारीचे निवारण करणे अपेक्षित आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
९. उपरोक्त प्रमाणे तक्रारींवर देण्यात आलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने CSC-SVC कंपनीला कार्यवाही करणे बंधनकारक राहिल.
१०. केंद्र चालक तसेच सीएससी-एसपीव्ही कंपनी सर्व सेवा ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन देईल. या करिता त्यांचा मोबदला ग्रामपंचायतीने अदा करणे अपेक्षित आहे. या करिता Online Invoice Generation सुविधा केलेली आहे. काही केंद्रचालक या Online सुविधेवर Invoice तयार करत नाहीत.
यास्तव त्यांच्या मानधनाच्या वाटपामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत सदर वस्तुस्थितीची चौकशी करुन या केंद्र चालकांना पुढे चालू ठेवण्याबाबत गटविकास अधिकारी स्तरावर निर्णय घेण्यात यावा. सदर निर्णय देखील CSC-SVC कंपनीस बंधनकारक असेल.
हे वाचले का?
- गाव गावातील रस्ते होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा सुरू
- आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !
- तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |
- “ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपले सरकार सेवा केंद्र चालकावर होणार कारवाई GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा