आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

Share
आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आहे. परंतु आता सहा महिने थांबूनही काही होत नाही.

जनतेची कामे लवकर होण्याऐवजी त्यांना आता अधिकाधिक उशीर केला जात आहे. शासकिय कार्यालयात आपले काम नेमके कुठे आणि कुणामुळे अडले आहे हे सामान्य माणसाला समजत नाही.

या कार्यालयांमधील अधिका-यांचे आणखी एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे जोपर्यंत आपल्या गळ्याशी येत नाही तोपर्यंत कोणताही अधिकारी किंवा व कर्मचारी कशालाही घाबरत नाही.

परंतु जर एखाद्या कामात त्याने केलेली गडबड किंवा त्याची जबाबदारी निश्चित झाली तर मात्र त्याची त्रेधा उडते.परंतु ही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व निश्चित करायचे कसे.

खरे तर त्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही .खालील काही साधे प्रश्न आणि माहिती, माहिती अधिकारात विचारल्यास आपला अर्ज किंवा माहितीशी संबंधित अधिका-याची जबाबदारी निश्चित होऊ शकते आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती मिळेल.

माहिती अधिकार अर्जाचा नमुना खालील प्रमाणे१) माझा अर्ज / तक्रार किंवा नस्ती (फाइल) आपल्या विभागाकडे पोहोचल्यानंतर त्या संदर्भातील दैनंदिन प्रगतीचा हवाल : उदा. माझा अर्ज / तक्रार किंवा नस्ती आपल्या विभागातील ज्या ज्या अधिकारी-यांकडे किंवा कर्मचा-याकडे पोहोचला त्यांनी त्यावर केलेल्या प्रक्रियेची माहिती.

२) आपल्या विभागाच्या नियमाप्रमाणे अशा अर्जावर / तक्रारीवर किंवा नस्तीवर निर्णय घेण्यासाठी लागणा-या कालावधीची माहिती.

३) माझ्या अर्जावर / तक्रारीवर किंवा नस्तीवर निर्णय घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांची नावे व हुद्दयाचा तपशील.

४) मा‍झ्या अर्जावर / तक्रारीवर किंवा नस्तीवर निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी ज्या अधिका-याची होती त्याचे नाव व हुद्दा याचा तपशील.

हे ही वाचा

५) माझ्या अर्जावर / तक्रारीवर किंवा नस्तीच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्व कागदपत्रांच्या त्यावरील फाइल नोटींगसह प्रत.

६) मा‍झ्या अर्जावर / तक्रारीवर किंवा नस्ती संदर्भात योग्य वेळेत निर्णय न घेतल्या बाबत आपल्या विभागाच्या नियमाप्रमाणे संबधीतांवर करण्यात आलेल्या कारवाईची तपशीलवार माहिती व संबंधित कागदपत्रांच्या प्रति मला देण्यात याव्यात.

(महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र शासकिय कर्मचा-यांच्या बदलाचे विनियमन आणि शासकिय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम, २००७ अन्वये केलेल्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार केलेल्या कारवाईची माहितीही मागता येऊ शकेल)

७) माझा अर्ज / तक्रार किंवा नस्तीसारखी जी प्रकरणे मा‍झ्या प्रकरणाच्या सात दिवस (आपण कितीही दिवस लिहू शकता) आधी आणि नंतर आपल्याकडे आली त्यावर घेण्यात आलेल्या अंतिम निर्णयाची तपशीलवार माहिती.

ज्या अर्जाबद्दल किंवा तक्रारीबाबत माहिती मागवायची आहे त्याची प्रत जोडावी तसेच ज्या नस्ती (फाइल) किंवा विषयाबद्दल वरील माहिती मागावयाची आहे त्याचा स्पष्ट उल्लेख असावा.

वरील सात साधे प्रश्न आपले काम कुठे, कुणामुळे आणि किती दिवस अडकून पडले आहे याची माहिती मिळवून देण्यास मदत करतील.

परंतु हे प्रश्न विचारताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याला नेमकी काय माहिती आणि कशासाठी मिळवायची आहे ? त्यातून काय साध्य करायचे आहे? याची निश्चित कल्पना आपल्याला असली पाहिजे.

मुळ लेखक विजय कुंभार सर यांच्या वॉल वरून सआभार

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मोबाईल वर विविध कायदेविषयक, सरकारी योजना व शासन निर्णय (GR) या करता टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

3 thoughts on “आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !”

  1. अतिशय ज्ञानवर्धक माहिती आहे,परंतू कायद्यात खुप कमी असल्याने प्रभावी नाही।

  2. Pingback: मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार - माहिती असायलाच हवी

  3. Pingback: माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा पुणे येथे संपन्न » RTI Today

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.