Adoption law

Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती

4 कलम ११ दत्तक ग्रहणाच्या (Adoption law ) अन्य शर्ती.

 1. जर दत्तक-ग्रहण पुत्राचे असेल तर दत्तक घेणार्‍या माता-पित्याला दत्तक ग्रहणाच्या वेळेस हयात असलेला (औरस रक्त संबंधाचा किंवा दत्तक संबंधाचा) हिंदू पुत्र किंवा पुत्राचा पुत्र किंवा पुत्राच्या पुत्राचा पुत्र नसावा.
 2. जर दत्तक ग्रहण कन्येचे असेल तर दत्तक घेणार्‍या माता-पित्याला दत्तक ग्रहणाच्या वेळेस हयात असलेली (औरस रक्तसंबंधाची किंवा दत्तक संबंधाची) हिंदू कन्या किंवा पुत्राची कन्या नसावी.
 3. जर कन्येचे दत्तक ग्रहण होत असेल तर दत्तक घेणारा पिता, दत्तक घेत असलेल्या कन्येच्या वयापेक्षा किमान एकवीस वर्षांनी मोठा असावा.
 4. जर पुत्राचे दत्तक ग्रहण होत असेल तर दत्तक घेणारी माता दत्तक घेत असलेल्या. पुत्राच्या वयापेक्षा किमान एकवीस वर्षांनी मोठी असावी.
 5. एक अपत्य, एकाच वेळी दोन किंवा अधिक व्यक्तींना दत्तक घेता येणार नाही.
 6. दत्तक-ग्रहण हे प्रत्यक्षात घडले पाहिजे, फक्त कागदोपत्री नाही.

4 कलम १२ दत्तक ग्रहणाचे परिणाम.

दत्तक घेतले गेलेल्या आपत्याची, दत्तक-ग्रहणाच्या दिनांकापासून, त्याच्या जनक घराण्याशी असलेले संबंध तुटले आहेत असे मानले जाईल व ते आपत्य त्याच्या दत्तक माता-पित्याचे आपत्य असल्याचे मानले जाईल.

 • दत्तक घेतले गेलेले आपत्य जर त्याच्या जनक घराण्यातच राहिले असते तर, त्याचा विवाह ज्या व्यक्तीशी होऊ शकला नसता अशा व्यक्तीशी त्याला विवाह करता येणार नाही.
 • दत्तक आपल्याला दत्तक-ग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता किंवा त्यावरील दत्तकग्रहणापूर्वीची आबंधने त्याच्याकडेच निहित राहतील.
 • दत्तक आपल्याला दत्तक-ग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता कोणीही काढून घेऊ शकणार नाही.

4 कलम १३ दत्तकग्राही माता-पित्याला त्यांच्या मालमत्तेची हयात व्यक्तींमध्ये हस्तांतरणा द्वारे किंवा मृत्यूपत्र द्वारे विल्हेवाट लावण्याचा अधिकार असेल.

4 कलम १४

 1. दत्तक घेणार्‍या पुरुषाची पत्नी दत्तक घेतले गेलेल्या आपत्याची दत्तकग्राही माता असल्याचे मानले जाईल.
 2. दत्तक घेणार्‍या पुरुषाला एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर त्या पत्नीपैकी विवाहामध्ये ज्येष्ठ असणारी पत्नी दत्तक घेतले गेलेल्या आपत्याची दत्तकग ही माता असल्याचे मानले जाईल व त्या पुरुषाच्या इतर पत्नी सावत्र माता मानल्या जातील.
 3. एखादा अवाहित किंवा विधुर पुरुष जर दत्तक घेईल आणि त्यानंतर एखाद्या स्त्रीशी विवाह करेल तर त्या दत्तक घेणार्‍या पुरुषाची पत्नी दत्तक घेतले गेलेल्या आपत्याची सावत्र माता मानली जाईल,
 4. एखादी अवाहित किंवा विधवा स्त्री जर दत्तक घेईल आणि त्यानंतर एखाद्या पुरुषाशी विवाह करेल तर त्या दत्तक घेणाऱ्या स्त्रीचा पती दत्तक घेतले गेलेल्या आपत्याचा सावत्र पिता मानला जाईल.

4 कलम १५ दत्तक-ग्रहण रद्द करणे.

कोणतेही कायदेशीर दत्तकग्रहण दत्तकग्राही माता किंवा पित्याकडून रद्द करता येणार नाही. तसेच दत्तक आपत्यही दत्तकग्राही माता-पित्याचा त्याग करून त्याच्या जनक घराण्यात जाऊ शकणार नाही.

4 कलम १७ दत्तक ग्रहणासाठी देवाण-घेवाण.

कोणत्याही कायदेशीर दतक-ग्रहणासाठी मोबदला म्हणून कोणत्याही रकमेची किंवा बक्षि‍साची देवाण-घेवाण करता येणार नाही किंवा तशी कबुलायत करता येणार नाही. या कलमाचा भंग झाल्यास कारावास आणि दंडाची तरतुद आहे.

महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय

हिंदू उत्तराधिकार अधिनियम, 1956 (Adoption law ) अंमलात आल्यानंतर जर एखाद्या विधवा स्त्रीस, एखादा मुलगा दत्तक घेतला असेल तर त्या दत्तक मुलाला, विधवेला मिळालेल्या मिळकतीमध्ये कसलाही अधिकार प्राप्त होणार नाही.

कलम १४ अन्वये हिंदू स्त्री मालक झाल्यानंतर तिने एखादा मुलगा दतक घेतला असेल तर त्या दत्तक मुलाला त्या हिंदू स्त्रीच्या मिळकतीमध्ये कसलाही अधिकार प्राप्त होत नाही. (केशरभाई जगन्नाथ गुजर वि. महाराष्ट्र सरकार आणि इतर ए.आय.आर. १९८९, मुंबई, ११५)

एकत्र कुटुंब असेल आणि त्यांची एकत्रीत मिळकत असेल तर दत्तक घेतल्या मुलाला कुटुंबाच्या मिळकतीत हक्क प्राप्त होतो. (ए.आय. आर. २००१, राजस्थान, ३१८)

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top