विहीर सोलर पंप अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार सहा लाख अनुदान.

विहीर सोलर पंप अनुदान योजना

विहीर सोलर पंप अनुदान योजना परिचय Bore Well/dug Well With Solar Pump (5hp) for irrigation of land

वन हक्क कायदा २००६ अंतर्गत वन पट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच शेतीला पाणी पुरवठा करण्या करीता विहीर/बोअरवेल करणे, वनपट्टे धारकांच्या शेतीत सोलर पंप बसवुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातुन विहीर सोलर पंप अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.

Bore well / dug well with solar pump (५ hp) for irrigation of land given under FRA २००६ ह्या योजनेच्या मार्गदर्शक सुचना शासन निर्णयान्वये निर्गमित करणेत आल्या आहे. तथापि, योजना अंमलबजावणी ही राज्यस्तरावरुन व्हावी तसेच लाभार्थ्याला देणेत येणारे विहीर अनुदान हे नियोजन विभाग व विहीर सोलर पंप अनुदान हे उर्जा विभाग यांच्या प्रचलित शासन निर्णयानुसार सुधारीत करणेची करणेत आली आहे.

सदर विनंतीच्या अनुषंगाने नवीन शासन निर्णयान्वये निर्गमित करणेत आलेल्या मार्गदर्शक सूचना अधिक्रमित करुन सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

हे वाचले का?  List Of Important Documents सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे..? जाणून घेऊया कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत..?

विहीर सोलर पंप अनुदान योजना शासन निर्णय

वनहक्क कायद्यातंर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता विहीरींची निर्मिती करणे, वनपट्टे धारकांच्या शेतीत सोलारपंप बसवुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातुन Bore well / dug well with solar pump (५ hp) for irrigation of land given under FRA २००६

ही सन २०१५-१६ मध्ये विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत रु. १८००.०० लक्ष किंमतीची मंजुर योजना राबविण्यासाठी दि. २६.०८.२०२१ रोजीच्या शासन निर्णया सोबतचे परिशिष्ट १ अन्वये देणेत आलेल्या मार्गदर्शक सुचना अधिक्रमित करुन सुधारित मार्गदर्शक सुचनांना सोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक १ नुसार मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत तरतूदींच्या मर्यादेत योजना राबविण्याबाबत त्वरीत कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी करावी व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक व अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

विहीर सोलर पंप अनुदान योजना योजनेचे नाव– Bore well / dug well with solar pump (५ hp) for irrigation of land given under FRA २००६

हे वाचले का?  हक्कसोड पत्र म्हणजे काय ? Hakka Sod Patra Mhanje Kay?

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

विहीर सोलर पंप अनुदान योजना उद्देश / हेतु

वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतीला पाणी पुरवठा करण्याकरिता विहीर करणे व सोलार पंप बसविणे,

एकुण मंजूर निधी / वित्तीय तरतूद- विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत सन २०१५-१६ करिता मंजुर रु.१८००:०० लक्ष रूपये, योजना कालावधी १ वर्षे.

योजनेतील लाभार्थी- आयुक्त आदिवासी विकास, नाशिक यांचेकडुन प्रकल्प कार्यालयनिहाय (वनपट्टे वाटप झालेल्या प्रकल्पांतर्गत) लक्षांक निश्चित करणेत येतील.

योजना खर्चाचे अंदाजपत्रक-

प्रति लाभार्थी अनुदानाची मर्यादा खालीलप्रमाणे असेल. विहीर रक्कम ३,००,०००/ अधिक सोलार पंप, पॅनल (५HP) ३,२५,०००= एकुण ६२५००० रूपये. उपरोक्त नमुद बाबींकरीता ठरविण्यात आलेली अनुदानाची मर्यादा ही शासनाच्या धोरणाप्रमाणे ठरविण्यात आलेली महत्तम मर्यादा आहे.

योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रती लाभार्थी कभी खर्च येत असेल तर त्याप्रमाणे अनुदान अदा करणेत येईल व शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांकात वाढ करण्याचे अधिकार मुल्यमापन व संनियंत्रण समितीस असतील.

योजना अंमलबजावणी यंत्रणा

विहीरींकरिता संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व कृषी विभाग / भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा / ग्रामिण पाणी शासकीय यंत्रणा • सोलार पंप करिता सोलार पंप, पॅनेल (५HP) ची खरेदी विहीत पद्धतीने आयुक्तालयाचे स्तरावरून करण्यात यावी,

हे वाचले का?  "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" २०२२ मार्गदर्शक सूचना

योजना नियंत्रण अधिकारी

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक. निधी वितरण कार्यपद्धती- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक हे संबंधित प्रकल्प अधिकारी यांना विहीर अनुदानाकरिता निधीचे वाटप करतील. प्रकल्प अधिकारी संबंधित अंमलबजावणी यंत्रणेला टप्पेनिहाय निधी वितरित करतील..

वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीचे लाभार्थी शेतामध्ये विहीरींच्या माध्यमातुन जलसंचनाची सुविधा निर्माण होणे व सोलार पंपच्या माध्यमातुन शेतीला पाणी पुरवठा करु शकतील व त्याआधारे उत्पन्नाच्या शाश्वत मार्गाद्वारे जीवनमानाचा दर्जा उंचावतील.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top