Aamdar Vikas Nidhi ? आमदार निधीचा हिशोब कसा मागावा……?

Aamdar Vikas Nidhi

Aamdar Vikas Nidhi माहिती

महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभा आणि विधानपरिषद ही दोन सभागृहे आहेत. विधानसभेत २८९ आणि विधानपरिषदेत ७८ Aamdar आहेत. ही एकूण संख्या होते ३६७ इतकी.

या सर्व आमदारांना प्रत्येक वर्षाला प्रति Aamdar एक कोटी (अलिकडेच वाढीव घोषणा झाली आहे प्रतिवर्षी दीड कोटी इतका निधी देण्याची ) इतका विकास निधी (Aamdar Vikas Nidhi) मिळतो.

अशी मागवा आमदार निधीची माहिती

या निधीमधून आमदार त्यांना योग्य वाटेल अशा विकास कामासाठी निधी देऊ शकतात. हा सर्वस्वी आमदारांच्या इच्छे नुसार वितरीत होते. मात्र या वितरणावर जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण असते.

तसेच या निधीच्या दैनंदिन व्यय व्यवस्थापनाचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतील जिल्हा नियोजन समितीकडे असते. परंतु हा विकास निधी कोणत्या सार्वजनिक कामासाठी द्यावा. कधी द्यावा, किती द्यावा हे सर्वस्वी आमदार महोदयांच्या इच्छेनुसार ठरते.

हे वाचले का?  तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |

महाराष्ट्राच्या विधीमंडळातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोकप्रतिनिधी सोडले तर या निधीचा वापर करताना बहूतांश आमदारांनी व्यापक सार्वजनिक हिताला हरताळ फासून आपल्या नातलगांचे हित, आपल्या कार्यकर्त्यांचे हित,आपल्या पक्षाचे हित आणि आपणच पोसलेल्या कंत्राटदाराचे हित पाहतात. असा आजवरचा अनुभव आहे.

येथे पहा माहिती अधिकार नमुना अर्ज

आमदार हे खरे तर जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेल्या विकास निधीच्या खर्चात खरे तर जनतेच्या विकासाचे प्रतिबिंब दिसायला हवे. परंतु बरेच आमदार या निधीचा मनमानी असा वापर करताना दिसत आहेत.

मुंबई काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या आमदारांच्या विकास निधी ची माहिती अधिकार कायद्यान्वये मागवली असता त्यात आश्चर्यकारक अशी अनियमिता आढळली.

अशी मागवा आमदार निधीची माहिती

अंगणवाडीच्या नावाने बांधलेल्या इमारतीत सदरील आमदारांच्या पक्षाचे कार्यलय काही कार्यकर्ते चालवत असलेले आढळून आले. तसेच आमदार निधीच्या खर्चातही मोठी संधिग्धता असलेले दिसून आले.

हे वाचले का?  घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे?

आमदार निधी जरी आमदारांनी स्वच्छेने वापरायचा निधी असला तरी तो खऱ्या अर्थाने जनतेचा पैसा आहे. जनतेला दरवर्षी खर्च होणाऱ्या पाचशे कोटी रुपयांचे होते तरी काय याचा हिशेब मागण्याचा पूर्ण अधिकार आहे.

येथे पहा माहिती अधिकार नमुना अर्ज

म्हणून माहिती अधिकार या कायद्याचा वापर करून आरटीआय कार्यकर्त्यांनी या निधीचा (Aamdar Vikas Nidhi) हिशेब तपासून या निधीच्या विनीयोगात आधिक पारदर्शकता कशी आणता येईल ? हे पाहीले पाहिजे.

माहितीचा अधिकार नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

हे वाचले का?  बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

हे ही वाचा

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Aamdar Vikas Nidhi

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top