शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद

शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद
शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद

राष्ट्रीय अन्न सुरक्षा गरीब व गरजू लोकांना त्यांची भूक भागविता यावी त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केंद्र शासनाने संमत केला आहे. या नुसार गरजू लोकांना त्यांच्या उत्पन्न गटा नुसार शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद देण्यात येत असतात याची माहिती आज आपण घेणार आहोत.

शिधापत्रिका:

शिधापत्रिका देतांनाचे निकष याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी शासन निर्णय क्रमांक शिवाप- २०१३/प्र.क्र. १.०५/नापु-२८, दिनांक २९/६/२०१३ अन्वये विस्तृत माहिती दिली आहे.

तिहेरी शिधापत्रिका योजना

सर्व साधारणतः सधन कुटुंबातील व्यक्ती स्वस्त धान्य दुकानामधील धान्य घेत नाहीत. तेत्र धान्य गरीब व गरजू लोकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिकेवर धान्य न घेणाऱ्या सधन कुटुंबांना शिधापत्रिकेवर धान्य देणे बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी राज्यामध्ये दि. १ मे १९९९ पासून तिहेरी शिधापत्रिका योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यामध्ये सर्व शिधापत्रिका/ रेशनकार्ड धारकांना पुढील निकषाप्रमाणे तीन रंगाच्या शिधापत्रिका वितरीत करण्यात येतात.

पिवळ्या शिधापत्रिका/ रेशनकार्ड साठी निकष:

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (बी.पी.एल.) लाभार्थ्यांना पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिकेसाठी:

 • आयआरडीपीच्या यादीत समाविष्ट असावी.
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १५,०००/- या मर्यादित असावे.
 • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाऊटंट नसावी.
 • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत नसावी किंवा भरण्यास पात्र नसावी.
 • कुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा.
 • कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे.
 • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायत किंवा एक हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारामाही बागायत (दुष्काळी तालुक्यात त्याच्या दुप्पट क्षेत्र) जमीन नसावी.
हे वाचले का?  Ration दिवाळी पर्यंत मिळणार मोफत मिळणार | Free ration | Ration card Last update |

● शासन निर्णय दि. ९.९.२००८ अन्वये राज्यातील सर्व विडी कामगार तसेच सर्व पारधी व कोल्हाटी समाजाच्या कुटुंबांना आणि शासन निर्णय दि.२९.९.२००८ व २१.२.२०७९ अन्वये परित्यक्त्या व निराधार स्त्रियांना तात्पुरत्या स्वरुपात बी.पी.एल. शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दि. १७.०१.२०११ च्या शासन निर्णयान्वये यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

●शासन निर्णय दि. १७.३.२००३ अन्वये बंद पडलेल्या कापड गिरण्या, सूत गिरण्या, साखर कारखाने इ. मधील कामगारांना पिवळ्या शिधापत्रिकांचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.

“ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार.

केशरी शिधापत्रिकेसाठी निकष

खालील अटींची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका देण्यात येतात.

 • कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. १५,०००/- पेक्षा जास्त परंतु १ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त नसावे.
 • कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन नसावे. (टॅक्सी चालक वगळून)
 • कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून ४ हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती जमीन असू नये.

शुभ्र शिधापत्रिकांसाठी निकष:

ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न १ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन असेल किंवा त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टरपेक्षा जास्त बारमाही शेतजमीन असेल अशा कुटुंबांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येतात.

हे वाचले का?  कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ Domestic Violence act

शिधापत्रिका मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

नवीन शिधापत्रिका/ रेशनकार्ड:

 1. अर्ज कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री हिचा कुटुंबप्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज.
 2. अर्जदार कुटुंब प्रमुख खिचे २ फोटो, त्यावर अर्जदाराची सही करुन.
 3. अर्जासोबत बैंक जॉइंट अकाऊंट (पती व पत्नीचे नावे) काढलेबाबतचे बैंक पासबुकची प्रत
 4. आधार कार्डची प्रत अथवा आधार कार्ड नोंदणी केलेबाबतची पावतीची साक्षांकित छायांकित प्रत.
 5. नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे, नसेल तर मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा शिधापत्रिकेत नाव नसलेबाबतचा दाखला.
 6. राहत्या जागेचा पुरावा म्हणून स्वतःचे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षांची मिळकत कर पावती, तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्यांचे नावे विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती.

PF खातेदारांना मिळणार 7 लाखांचा विमा, EPFO Members Insurance

• दुबार शिधापत्रिका/ रेशनकार्ड:

 1. शिधापत्रिका हरवली असल्यास कार्ड हरविले बाबत पोलीसांचा दाखला.
 2. स्वस्त धान्य दुकानदारा कडील शिधापत्रिका चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला.
 3. शिधापत्रिका जीर्ण झाली असल्यास शिधापत्रिका व स्वस्त धान्य दुकानदाराचा सही व शिका असणे आवश्यक आहे.
 4. जीर्ण कार्ड वरील अक्षर पुसट असेल तर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे.
 5. अर्जा सोबत ओळखपत्राचा पुरावा.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

शिधापत्रिकेमध्ये युनिट वाढ करणे:

 1. लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी मुलांचे जन्म दाखले, शाळेतील बोनाफाईड दाखल्याची साक्षांकित प्रत.
 2. पत्नीचे नाव वाढविण्यासाठी माहेर च्या कार्डातून नाव कमी केले बाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी, यांचा दाखला दाखल व लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
 3. मोठ्या व्यक्तींचे नाव वाढविण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केले बाबतचा दाखला
हे वाचले का?  ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश GR

• शिधापत्रिका/ रेशनकार्ड मधील युनिट कमी करणे:

 1. मुलींचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका
 2. मयत असल्यास मयत दाखला
 3. परवानगी जोडून नाव कमी करण्याचा भरलेला अर्ज असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज
 4. अर्जासोबत ओळखपत्र पुरावा.

शिधापत्रिका मिळण्याचा कालावधी

 1. नवीन शिधापत्रिका १ महिना.
 2. दुबार शिधापत्रिका ८ दिवस
 3. शिधापत्रिका नुतनीकरण १ महिना
 4. शिधापत्रिका मधील नावात बदल व युनिट मध्ये वाढ अथवा घट ३ दिवस

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.