ई-पीक पाहणी (E Pik Pahani) प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकर्यांसाठी ( Land Record) वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन-२ विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित मोबाईल अॅप १ ऑगस्ट २०२२ पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ! अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
E Pik Pahani शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यां मार्फत करण्यात येणार आहे. तलाठी हे पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.
ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ! अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी ४८ तासामध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजने अंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावली द्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ! अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये असलेल्या मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
हे वाचले का?
- शेती कुंपण योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग उभारणीची योजना.
- आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary)
- Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार
- शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ
- श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन
- पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा