Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार

consumers-rights-on-petrol-pump
consumers-rights-on-petrol-pump
consumers-rights-on-petrol-pump

आजच्या धकाधकीच्या व वेगवान दुनियेत मालकीचे वाहन असणे ही अत्यावश्यक गरज बनलेली आहे. त्यामुळे वाहन धारकांना इंधन भरण्यासाठी Petrol Pump वर पेट्रोल, डिझेल किंवा CNG Gas भरण्यासाठी जावेच लागते. या इंधन ग्राहकांनी केवळ पेट्रोल पंपावर जायचे आणि दिले तसे देईल तसे इंधन भरावे आणि चालू लागावे हे दिवस आता राहविलेले नाहीत.

Petrol Pump वर इंधन भरणाऱ्या ग्राहकांचे काही हक्क व अधिकार आहेत. इंधना बरोबरच ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असून त्या सेवा जागरूक ग्राहक व जागरूक वाहन धारक म्हणून आपणास माहित असायलाच हवी. ग्राहकांचे अधिकार कोणते आहेत.

Petrol Pump वर ग्राहकांना विशेष सेवा पुरविणे बंधनकारक आहे.

  1. गाडीच्या चाकांतील हवा चेक करणे हवा भरणे निशुल्क.
  2. पिण्याचे पाणी, टॉयलेट सुविधा तसेच रेडिएटर्स मध्ये पाणी निशुल्क
  3. तक्रार आणि सूचना पुस्तिका मागणीनुसार दिलीच पाहिजे. त्यात आपण तक्रार लिहू शकता
  4. Petrol Pump चालू व बंद असणाच्या वेळा, कामाचे दिवस व सुटीच्या दिवसाचा स्पष्ट तक्ता प्रदर्शीत केला पाहिजे
  5. तेल कंपनीच्या अधिकार्‍याचे नाव पत्ता आणि टेलीफोन नंबर. आपण तक्रार असल्यास फोन संपर्क करू शकता.
  6. पुरेसा प्रकाश, स्वच्छता तसेच प्रथमोपचार पेटी असणे बंधनकारक आहे. ग्राहकांना गुणवत्ता पूर्ण सेवा देणे हे Petrol Pump चालकाचे कर्त्यव्य असून वरील सुविधा देणे हे पेट्रोललियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयांनी दिलेल्या दिशानिर्देशामध्ये स्पष्ट केले असून अशा सुविधा न देणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर सुविधा विनाविलंब देण्याचे निर्देश व दंडात्मक कारवाई केली जावू शकते.

नव-नवीन माहिती

पेट्रोल, डिझेल गुणवत्ता तपासण्यासाठी ग्राहकांना अधिकार आहेत

१. प्रत्येक Petrol Pump वर तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी फिल्टर पेपर ठेवणे बंधनकारक आहे. ग्राहकांनी मागीतल्यास फिल्टर पेपर दिलाच पाहिजे.

पेट्रोल पंपातील नोजल स्वच्छ व साफ करून फिल्टर पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाकावेत दोन-तीन मिनिटानंतर फिल्टर पेपरवर काही डाग व धब्बे दिसले तर पेट्रोल मध्ये भेसळ आहे असे समजावे. जर फिल्टर पेपर पूर्वीप्रमाणेच स्वच्छ व साफ दिसला तर पेट्रोल शुद्ध आहे समजावे.

२. पेट्रोल पंपा चालकांनी तेलाची घनता मोजण्याचे व घनता नोंदीची उपकरणे ठेवली पाहिजेत.

३. पंप डिलर नी पाच लिटर चे माप ठेवणे जरूरी आहे. आपण मापाने मोजून पेट्रोल घेवू शकता. हे माप दरवर्षी वजने व मापे नियंत्रकाकडून प्रमाणित केलेल असणे आवश्यक

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

४. तेलाच्या किंमती स्पष्टपणे दिसतील अशा प्रदर्शीत केल्या पाहिजेत. मिटर रिडींग शून्य केले आहे याची ग्राहकांनी खात्री करून घ्यावी. भेसळ असल्याची शंका आल्या फिल्टर पेपर परिक्षण करावे. तक्रार असल्यास तक्रार पुस्तिकेत तक्रार लिहावी तेल कंपनीच्या अधिका-यांना टेलीफोन संपर्क करून तक्रार करता येईल.

तेल कंपनीच्या अधिकार्‍याचे नाव पत्ता व संपर्क क्रमांक पेट्रोल पंपावर प्रदर्शीत केले नसेल तर संबंधीत तेल कंपनीच्या रिजनल ऑफिस कडे तक्रार करावी. तक्रार लेखी द्यावी, तक्रारीची पोच घ्यावी, तीस दिवसात तक्रार निवारण करणे कंपन्यांवर बंधनकारक असते.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा.

consumers-rights-on-petrol-pump

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top