आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या कोट्यावधी खातेदारांच्या सोयीसाठी नवनवीन योजना आणतं असते.
आता कर्मचारी निवृत्तीवेतन योजने शिवाय EPFO ने जीवन विम्याचा लाभ देखील देने सुरू केला आहे.
या जागतिक कोरणा महामारी संकटाच्या वेळी कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजना 1976 (EDLI Scheme) अंतर्गत देण्यात आलेल्या विमा रकमेची मर्यादा आता सात लाख रुपये करण्यात आली आहे.
या योजने मुळे आता तमाम EPFO खातेदारांना फायदा होणार आहे.कारण या योजनेत कर्मचार्यांना कोणतेही योगदान/हप्ता भरावा लागत नाही.
EPFO Insurance योजनेची सविस्तर माहिती घेऊया.
आपण Insurance Claim केव्हा करू शकतो-
सरकारच्या EDLI Scheme योजने अंतर्गत कर्मचारी यांचा जर आजाराने, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू नंतर कर्मचार्याच्या वतीने नातेवाईक दावा दाखल केला जातो.
मृत्यूच्या ताबडतोब 12 महिन्यांच्या आत दावा दाखल करता येतो, कर्मचारी जरी एकापेक्षा जास्त आस्थापनांमध्ये / कंपनी मधे काम केले असेल तरीही पीडित कुटुंबालाही हे कव्हर दिले आहे.
कोण क्लेमचा दावा दाखल करु शकतो?
PF खातेधारकाच्या मृत्यू नंतर नॉमिनी/ वारसदार यांच्या मार्फत दावा केली जाते. जर कर्मचारी यांनी वारस नोंद केली नसेल तर कायदेशीर वारसांना यांचा लाभ दिला जातो. म्हणजेच या योजनेंतर्गत नॉमिनी/ वारस नोंद न झाल्यास मृत कर्मचार्याची जोडीदार, त्याच्यी मुले ही लाभार्थी होतात.
या योजनेत किती पैसे भरावे लागतात?
योजनेंतर्गत एकरकमी हप्ता हा EPFO मार्फत भरला जातो. यासाठी कर्मचार्यास कोणतीही रक्कम देण्याची गरज पडत नाही. म्हणजेच हे विमा संरक्षण EPFO ग्राहकांना विनामूल्य उपलब्ध आहे. त्याचा फक्त PF नियमीत कपात होणे आवश्यक आहे. कोरोना मुळे मृत्यू हे देखील यात सामील करून घेण्यात आले आहेत.
Insurance Claim कसा करावा?
आपल्याला क्लेम मिळविण्यासाठी फॉर्म- 5 IF जमा करावा लागेल. यानंतर सदर कर्मचारी कामावर असलेल्या कंपनी मार्फत व्हेरिफिकेशन प्रोसेस करण्यात येईल.
सर्व कागदपत्रे यांची पडताळणी केल्यानंतर आपल्याला Insurance Claim हा वारसदारांना देण्यात येईल.
फॉर्म-5 IF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजना 1976 EDLI Scheme जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा