Farmer Schemes या योजनांसाठी शेतकऱ्यांना मिळते अडीच लाख रुपयांपर्यंत कर्ज |

Farmer Schemes

Farmer Schemes केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना अंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमधून विविध लाभ घेता येऊ शकतात.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

Farmer Schemes कशासाठी किती अनुदान मिळणार?

१. इलेक्ट्रिक कनेक्शन साठी १० हजार

शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी मोटारीने काढणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन करिता १० हजार रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

हे वाचले का?  Savitribai Phule Scholarship 5वी ते 10वीच्या मुलींना मिळणार शिष्यवृत्ती | पहा संपूर्ण माहिती |

२. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदायची असेल, त्या शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

३. तुषार सिंचनासाठी २५ हजार:

तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये एकूण 90% अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत एकूण खर्चाच्या टक्केवारीवर आधारित अनुदानाची पद्धत कायम ठेवण्यात आली आहे.

४. ठिबक सिंचनासाठी 50 हजार:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रांतर्गत किंवा क्षेत्राबाहेरील उपाय योजना अंतर्गत ठिबक सिंचनासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार.

५. सोलर पंप साठी १० हजार:

पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरुपम बसवायचे असतील तर अशा शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते. सबसिडी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना सौर पंपाच्या एचपी नुसार दिली जाते.

हे वाचले का?  krishi swavalamban yojana डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ

६. विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार:

ज्या शेतकऱ्यांना आपल्या जुन्या विहिरीची दुरुस्ती करायची असेल अशा शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.

Farmer Schemes लाभासाठीचे निकष:

ज्या अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा असावा.
स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर जमीन असावी .
ज्या शेतकऱ्यांना विहिरी व्यतिरिक्त इतर लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांकडे 0.20 हेक्टर शेतजमीन असावी.
कमाल 6 हेक्टर पर्यंत शेतजमीन असावी.
तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड असावे.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार:

नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, इनवेल बोरिंग, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन संच, परसबाग, पीव्हीसी पाईप इत्यादींसाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

हे वाचले का?  Schemes for Women महिलांसाठी बचत व गुंतवणूक योजना : आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top