7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार

7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार
7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार

ग्रामीण भागातील वाद हे शेतजमीन पोट हिश्याशी संबंधित असतात,भूमि-अभिलेख विभागाने विशेष मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील गावांमध्ये शेतकर्‍यांचे 7/12 (Satbara Utare) उतारे त्यांच्या हिश्या प्रमाणे वेगळे करून दिले जाणार आहेत. तसेच त्यानुसार वैयक्तिक हिश्या प्रमाणे नकाशे ही तयार करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तसेच सह-हिशेधरकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

सद्या अस्तित्वात असणाऱ्या ७/१२ उतार्‍यावरती भाऊ-बहिण, भाऊ-भाऊ, तसेच जमिनीतील सहहिश्येदारांचे नावे असतात. 7/12 (Satbara Utare) उतार्‍यावरती असलेल्या नावा नुसार प्रत्येकाचा जमिनीतील हिस्सा हा निश्चित झालेला असतो. त्या हश्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीची वाटणी होऊन त्यांच्या ताब्यात ते क्षेत्र असते. वाटणी झालेले जमिनीच्या क्षेत्रानुसार त्यांची वहिवाट असते. मात्र या ठिकाणी 7/12 (Satbara Utare) उतारा हा एकच असतो त्यामुळे पोटहिश्या बाबत वाद निर्माण होऊन अनेक प्रकरणे कोर्टात जातात यामुळे सामान्य शेतकरी यांना नाहक भुर्दंड बसतो. 

आता या सर्वावर उपाय म्हणून राज्याच्या भूमी-अभीलेख विभागाने या पोटहिश्या चे स्वतंत्र ७/१२  उतारे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नुसार आता राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने “संमतीने अभिलेख पोटहिस्सा दुरूस्ती” या मोहिमेची सुरूवात केली आहे.

महाराष्ट्रातील राज्यातील ता.शिरोळ शिरढोण या गावात उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी याबाबतचा पथदर्शी कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविलेला होता. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती. शिरढोण गावातील ज्या शेतकऱ्यांनी पोटहिस्सा दुरूस्ती करून स्वतंत्र 7/12 (Satbara Utare) उताऱ्यासाठी अर्ज केले होते, त्यांचे Satbara Utare स्वतंत्र झालेले आहेत.

त्याबाबत सविस्तर अहवाल अभ्यास समितीला सादर केल्या गेला होता. त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून समितीने शिफारशी सुचवलेल्या नुसार राज्य भूमी अभिलेख विभागाने राज्यात पोटहिश्या नुसार स्वतंत्र ७/१२ उतारा बनविण्याबाबत “संमतीने अभिलेख पोटहिस्सा दुरूस्ती” या मोहिमेची सुरूवात केली आहे.

हे वाचले का?  मोफत रेशन प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ

“संमतीने अभिलेख पोटहिस्सा दुरूस्ती” योजना  अशी राबवली जाणार  

सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या सहकार्याने संबंधीत गावात ग्रामसभा घेतली जाणार असून या सभेत या “संमतीने अभिलेख पोटहिस्सा दुरूस्ती” योजनेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ज्यांना संमतीने पोटहिश्या चे ७/१२ उतारे स्वतंत्र करायचे आहेत त्यांच्यासाठी एक तारीख निवडल्या जाईल त्यानंतर त्या तारखेला भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधीत गावात जाऊन इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार आहे.

त्यानंतर पुढील आठवडाभरात त्या अर्जावरती योग्य ती कार्यवाही करून सर्व हिस्सेदारांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या जाणार आहे, त्यानंतर प्रत्येक जमिनीचे नकाशे करून तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येणार आहे, त्या नकाशानुसार तहसीलदार पोटहिश्या चे स्वतंत्र  ७/१२ उतारे करणार आहेत.

पोट हिश्याचे स्वतंत्र 7/12 (Satbara Utare) उतारे कुरण्यासाठीचे शुल्क

पोट हिश्यांचे स्वतंत्र ७/१२ उतारे करण्यासाठी 1000 रूपये इतके मोजणी शुल्क आकारले जाणार आहेत, मोजणीची आवश्यकता नसल्यास विना मोजणी ७/१२ व नकाशे स्वतंत्र करून दिल्या जाणार आहेत. भूमि-अभिलेख विभागाच्या या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

राज्यामधील प्रत्येक गावात आज जमिनीच्या पोटहिश्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रकरणे असून त्याबाबत शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि त्रास वाचणार आहे. राज्याच्या भूमि अभिलेख विभागाच्या या योजनेमुळे शेतजमीन वादात घट होणार असुन केवळ नाममात्र 1000 शुल्कात एका आठवड्यांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधितांच्या पोटहिश्या चे स्वतंत्र ७/१२  उतारे तयार होणार आहेत. येत्या काळात ही योजने चा जास्तीत जास्त लाभ राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.

हे वाचले का?  Maha E Seva Kendra महा ई सेवा केंद्र सुरू करायचे आहे...? ही आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे |

वडिलोपार्जित संपत्ती घर-जमिन आता 200₹ मधे नावावर होणार व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नव नवीन माहिती

अर्जदार यांनी पोटहिस्सा पोट हिश्याचे स्वतंत्र 7/12 अर्जा सोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावीत

  1. पोटहिस्से करण्यासाठी सर्व सहधारकांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज, जर एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी नसेल तर अशा प्रकरणामध्ये कार्यालयामध्ये सर्व संमतीने पोटहिस्सा करता येणार नाही.
  2. भूमापन क्रमांकातील सर्व उपविभाग चे चालू ३ महिन्यातील गाव नमुना नं. ७/१२
  3. धारण जमिनीमध्ये कसे पोट विभाग करावयाचे आहेत, ते दर्शविणारा सर्व सहधारकांच्या स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा तसेच गाव नमुना नं. ७/१२ वेगळा झाला असल्यास गाव नमुना नंबर ६ ड मधील कच्चा नकाशा. सदरचा नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठी यांचे कडील प्रमाणपत्र जोडावे.
  4. या नकाशाप्रमाणे प्रत्येक भोगवटादार यांच्या कब्जेवहिवाटीत असलेले अंदाजित क्षेत्र व अधिकार अभिलेखामध्ये असलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे द्यावा.
  5. अर्जदार यांनी समाईक क्षेत्राचा उदा. वीहिर, बोअरवेल, वस्ती, झाडे इत्यादीचा तपशील द्यावा. ६. संबंधित सर्व्हेनंबर / हिस्सा नंबर / गट नंबर ची यापूर्वी हद्द कायम मोजणी करून घेतली असल्यास त्याचा मो.र.नं. व मोजणीचा दिनांक.
  6. भोगवटदार यांची ओळख पट‍विण्यासाठी फोटो ओळखपत्राची स्वसाक्षांकीत छायाप्रत. (आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट व शासनाने दिलेले कोणतेही अधिकृत फोटो ओळखपत्र यापैकी कोणतेही एक) उपरोक्त प्रमाणे सर्व पुर्ततेनिशी अर्ज प्राप्त झालेनंतर मुळ भूमापन अभिलेखावरुन खात्री करून अर्जदार.
  7. यांचेकडून पोटहिस्सा करणेसाठी साधी मोजणी फी 1000 रु भरुन घ्यावी. सदर अर्ज ई-मोजणी आज्ञावलीव्दारे रितसर प्राप्त करून घ्यावा. त्यानंतर उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी अर्जदार व सहधारक यांना त्यांचे सोयीने रितसर मुदतीच्या नोटीसीने कार्यालयामध्ये चौकशी कामी हजर राहणेबाबत कळवावे.
हे वाचले का?  तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |

हे वाचले का?

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र 7/12 (Satbara Utare) उतारे होणार परिपत्रका डाऊनलोड येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top