Social Welfare Schemes जाणून घेऊया समाज कल्याण विभागाच्या विविध योजना…..!!

Social Welfare Schemes

Social Welfare Schemes तळागाळातील मागास वंचित बहुजन पर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक लोक उपयोगी योजना आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल, अशा पद्धतीने या योजनांची आखणी व अंमलबजावणी केली जाते.

अशाच काही महत्त्वाच्या योजनांचा माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

Social Welfare Schemes १. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना:

मागासवर्गीय घटकांतील आर्थिक दारिद्र्य दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे ध्येय निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना चालू करण्यात आली.

येथे पहा समाज कल्याण विभागाच्या विविध योजना

दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्याने त्यांना रोजगार हमी योजना किंवा खाजगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागते. परिणामी, त्यांच्या राहणीमानावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणे आवश्यक आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे म्हणून त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येते. 

हे वाचले का?  मोदी सरकारची महिलांसाठी नवी योजना | scheme for women |महिला बचत गटांना मिळणार ड्रोन |

जिल्ह्यातील अनुसूचित जाती नव-बौद्ध घटकांतील निवड झालेल्या लाभार्थी सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने १०० % अनुदान तत्त्वावर ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन करण्यासाठी देण्यात येते.

जिल्हास्तरावरील समितीकडून जमीन खरेदी केली जाते व नंतर निवड झालेल्या लाभार्थीस तिचे वाटप केले जाते.

यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती/ नवबौद्ध घटकांतील सदस्य असावा. तो दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जाती/ नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखाली परित्यक्ता, विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती /जमाती(अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 या अन्वये अत्याचार ग्रस्त /पीडित यांना प्राधान्य देण्यात येते.

येथे पहा समाज कल्याण विभागाच्या विविध योजना

लाभार्थीचे किमान वय 18 व कमाल वय ६० इतके असावे. ज्या ठिकाणी एखादा दारिद्र्यरेषेखालील कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील ६० वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीला सदर योजनेचा लाभ देता येईल.

२. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर:

या योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिवेटर किंवा रोटॅवेटर व ट्रेलर यांचा लाभ देण्यात येतो.

हे वाचले का?  Ayushman Bharat Health Insurance या योजनेंतर्गत होणार ५ लाख रूपयांपर्यत उपचार | असा घ्या लाभ |  

यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3.50 लाख इतकी राहील. या कमाल मर्यादेच्या रकमेच्या १० टक्के हिस्सा स्वयंसहायता बचत गटांनी भरल्यानंतर 90% शासकीय रक्कम अनुदान वितरित करण्यात येते.

यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 % सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत व त्यांचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत.

येथे पहा समाज कल्याण विभागाच्या विविध योजना

स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्यासाठी रुपये 3.50 लाखांच्या कमाल मर्यादा इतकीच अनुदान मर्यादा राहील.

योजनेचा लाभ एकदा घेतल्यानंतर पुनश्च्य लाभ दिला जाणार नाही. स्वयंसहायता बचत गटांना योजनेचा लाभ दिल्यानंतर सदरचे वस्तू गहाण किंवा विकता येणार नाही. स्वयंसहायता बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावेत सदर खाते आधार कार्डशी संलग्न असावे.

स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. सर्व सदस्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, ग्रामसेवक/सरपंच व तलाठी यांच्या रहिवासी प्रमाणपत्र असावे. अटी व शर्तींची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव किंवा अर्जांना मंजुरी दिली जाते.

हे वाचले का?  Best Saving Schemes या आहेत बचतीसाठी सर्वोत्तम योजना | मिळते आकर्षक व्याज |

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top