Krishi Yantrikaran Yojana शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी, एकूणच शेती विकासासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. अशाच प्रकारे शेतकऱ्यांसाठी शासनाने कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू केली आहे.
ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाते. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ हा महाडीबीटी पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना दिला जातो. कृषी क्षेत्रात यांत्रिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध यंत्रसामग्री, साधने आणि उपकरणे उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
येथे पहा शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?
यांत्रिकीकरणाचा वापर करून शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांसाठी लागणाऱ्या वेळेची बचत आणि मेहनत कमी करून त्यांचे शेतातून मिळणारे उत्पन्न वाढवता येते. लागवड, सिंचन, फवारणी किंवा कापणी यासारख्या विविध शेतीच्या कामांसाठी आधुनिक यंत्रसामग्री वापरून शेतकरी योग्य प्रकारे शेती करू शकतात.
तसेच ग्रामीण भागातील मजुरांची कमतरता दूर करण्यासाठी यांत्रिकीकरणामुळे मदत होऊ शकते. यांत्रिकीकरणामुळे कार्यक्षमता आणि मजुरीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट होऊ शकते.
येथे पहा शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?
Krishi Yantrikaran Yojana आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्यांचे बँक पासबुक
- सात बारा उतारा
- आठ अ उतारा
- जे यंत्र खरेदी केले आहे त्या यंत्राचे मूळ बिल
- यंत्र शेतकऱ्याच्या नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.
येथे पहा शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?
पात्रता:
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
शेतकऱ्याच्या नावावरती थोडी जमीन असावी
अर्ज करू इच्छिणारी व्यक्ती जर अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये येत असेल तर त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल
ट्रॅक्टर साठी अनुदान घ्यावयाचे असेल तर शेतकऱ्याच्या नावावर यंत्र असावे
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- PM ShramYogi Mandhan Yojana प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना: काय आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे………!!
- Uniform Civil Code जाणून घेऊया समान नागरी कायदा म्हणजे काय….? काय आहेत फायदे….?
- Non Agricultural Land Certificate आता जमिन NA करण्याची गरज नाही
- Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!
- PM Kusum Solar Scheme शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी….. सौर कृषी पंप अर्जासाठी अंतिम मुदत नाही….!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.