Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना……. असा करा अर्ज….

Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojan
Sanjay Gandhi Niradhar Yojan

Sanjay Gandhi Niradhar Yojana महाराष्ट्र शासनाचे निराधार वृद्ध व्यक्ती अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १८ सप्टेंबर १९८० च्या परिपत्रकानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सुरुवात १९८० साली करण्यात आली.

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडील निर्णय दिनांक ३० सप्टेंबर २००८ अन्वये १. संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना व २. इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना या दोन्ही योजना एकत्रित करुन संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजूर करण्यात आली आहे.

त्या योजनेसाठीचे निकष, अनुदान याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

येथे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

Sanjay Gandhi Niradhar Yojana पात्रतेचे निकष

  • किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा.
  • शासनाचे एखाद्या वित्त संस्थेने, धर्मादाय संस्थेने किंवा प्राधीकरणाने चालविलेल्या कोणत्याही संस्थेची किंवा निवासाची अंतर्वासी नसावा.
  • ६५ वर्षापेक्षा कमी वयाचे स्त्री / पुरुष व्यक्ती या नियमानुसार आर्थिक मदत मंजूर केली जाण्यास पात्र समजण्यात येईल.
हे वाचले का?  Ustod Kamgar Yojana ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ’

Sanjay Gandhi Niradhar Yojana असा करा अर्ज

पात्र व्यक्तींचे प्रकार

  • अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री / पुरुष
  • तसेच क्षयरोग, कर्करोग, एड्स, कृष्ठरोग यासारख्या दुर्धर शारिरीक व मानसिक आजारामुळे स्वतःचा चारितार्थ चालवू न शकणारे ६५ वर्षापेक्षा कमी वयाचे निराधार स्त्री पुरुष
  • निराधार महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणा-या किंवा या योजनेखाली विहित केलेलया उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणा-या महिला, अत्याचारित महिला व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.

येथे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

  • शेतमजूर महिला
  • आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असल्यास आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवा असणे आवश्यक आहे.
  • १८ वर्षाखालील अनाथ मुल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रतीवर्षी रु. २१,०००/- पर्यंत असणे आवश्यक आहे.
हे वाचले का?  Farmer Schemes या योजनांसाठी शेतकऱ्यांना मिळते अडीच लाख रुपयांपर्यंत कर्ज |

Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार मिळणारे अनुदान

वरीलप्रमाणे अटींची पूर्तता करणा-या एक व्यक्ती निराधार कुटुंबाला संजय गांधी निराधार मिळणारे अनुदान दरमहा १००० /- एवढे अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana असा करा अर्ज

निधीचे वितरण

नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती दर तिमाहीस शासनास कळवावी. नवीन लाभार्थ्याना लागणारा निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतरच त्यांनी लाभ देण्यात यावा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय करता नवीन ‘शरद शतम्’ योजना

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top