Lek Ladki Yojana राज्यातील गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून लेक लाडकी योजना राबविण्यात येणार आहे. योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.
Lek Ladki Yojana काय आहे योजना?
राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे.
कोणाला मिळेल लाभ?
ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे अशा 1 किंवा 2 मुलींना, तसेच एक मुलगा किंवा एक मुली असेल तर मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे
लाभ घेऊ इच्छिणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.
कुटुंबाचे पांढरे रेशन कार्ड असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
असा मिळेल लाभ:
- या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये,
- इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये,
- सहावीत ७ हजार रुपये,
- अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाईल.
- लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.
- राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
Lek Ladki Yojana आवश्यक कागदपत्रे:
- मुलीचे बँक पासबूक किंवा आई-वडिलांचे बँक पासबूक
- मुलीचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- कुटुुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाइल नंबर
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://youtu.be/zAuatwWvPtA?si=PC4azb2XnQX6LLwE