Lek Ladki Yojana Update लेक लाडकी योजना सुरू | पहा काय आहे पात्रता, आवश्यक कागदपत्रे |

Lek Ladki Yojana Update

Lek Ladki Yojana Update माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक १ एप्रिल २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Lek Ladki Yojana Update योजनेची उद्दिष्टे

१. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे,

२. मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

३. मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे,

४. कुपोषण कमी करणे.

५. शाळा बाह्य मुलींचे प्रमाण ० (शून्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

येथे पहा आवश्यक कागदपत्रे

अटी व शर्ती:-

१) ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

हे वाचले का?  लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!

२) पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील..

३) तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

४)दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

येथे क्लिक करून पहा किती लाभ मिळेल?

५) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील..

६) लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  PM Matru Vandana Yojana गर्भवती महिलांसाठी खास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.....

(७) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top