Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?

रास्त किमतींचा अधिकार:

कर्ज घेताना आपण आपल्या मालमत्तेतील काही भाग बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवतो. पण जर ते कर्ज फेडू शकण्यास असमर्थ ठरले, तर बँक गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. पण याची माहिती तुम्हाला बँकेकडून नोटीसीद्वारे द्यावे लागते. त्यामध्ये मालमत्तेची जी काही रास्त किंमत असेल ती किंमत, लिलाव कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला होणार आहे याचा तपशील, राखीव किंमत या गोष्टींचा उल्लेख केलेला असावा. कर्ज थकबाकीदार म्हणून तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे मूल्यांकन कमी असल्यास आक्षेप घेण्याचा अधिकार आहे.

कराराच्या अटींचा अधिकार:

बँक किंवा कर्ज वसुली करण्यासाठी जो एजंट असेल, तो कर्जदाराला दिवसाच्या कोणत्याही वेळी कर्जाची रक्कम फेडावी, यासाठी त्रास देऊ शकत नाही. तसेच जबरदस्तीही करू शकत नाही. बँकांना कर्ज वसुलीचे काम आऊटसोर्समार्फत करताना आचारसंहितेचे पालन करावे लागेल. आणि ग्राहकांना हाताळण्यासाठी प्रशिक्षित एजंट असतील, त्यांची नेमणूक करावी लागेल. त्यांना ग्राहकांची जी काही माहिती असेल त्याच्या गोपनीयतेची जाणीव असावी.

उत्पन्नाचा समतोल साधने:

तुम्ही गहाण ठेवलेली मालमत्ता जर बँकेने किंवा वित्तीय संस्थेने लिलावात काढली, आणि त्यानंतर जर कर्ज वसूल करून जी काही उरलेली रक्कम असेल ती बँकेला किंवा वित्तीय संस्थेला परत करावी लागणार आहे. मालमत्तेची किंमत ही कधीही वाढू शकते. त्यामुळे त्या मालमत्तेची किंमत आपल्याला जी काही रक्कम बँकेला परत करायचे आहे, त्यापेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे लिलाव प्रक्रियेवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top