How To Get Bank Loan? नवीन व्यावसायिकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?

बँकेकडून प्रामुख्याने दोन प्रकारची व्यावसायिक कर्ज दिली जातात.

एक म्हणजे खेळत्या भांडवलासाठी कर्ज आणि दुसरे म्हणजे दीर्घकालीन कर्ज

कॅश क्रेडिट-वर्किंग कॅपिटल (खेळत्या भांडवलासाठी दिले जाणारे कर्ज):

व्यवसायाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी व्यावसायिकाला खेळते भांडवल म्हणजे कॅश क्रेडिट-वर्किंग कॅपिटल या प्रकारचे कर्ज मिळते. व्यवसाय व्यवस्थित चालावा, यासाठी दिली जाणारी सुविधा म्हणजेच कॅश क्रेडिट आहे. मंदी मध्येही आपला व्यवसाय व्यवस्थित चालावा, यासाठी चांगल्या कॅश क्रेडिट ची गरज असते. एवढी रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मंजूर झालेले असेल, त्यापैकी महिन्या अखेर पर्यंत तुम्ही जेवढे पैसे वापराल, तेवढ्या वरतीच तुम्ही तेवढ्या वरतीच व्याज आकारले जाते. तुमचे debtors आणि stock यांच्या आधारावर कॅश क्रेडिट मंजूर होते.

बँक किंवा वित्तीय संस्थेबरोबर आपल्याला सुरळीत व्यवहार करणे व दृढ संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. याचा फायदा आपल्यालाच मिळतो. बँक किंवा वित्त संस्था व्यवसायासाठी इतर विविध प्रकारची कर्ज किंवा सुविधा देतात.

टर्म लोन (दीर्घकालीन कर्ज):

दीर्घकालीन कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा बिजनेस प्लॅन तयार असणे गरजेचे आहे. बिजनेस प्लॅन मध्ये तुमच्या व्यवसायाला लागणारी यंत्रसामग्री, कच्चा माल किंवा जागा या गोष्टींची माहिती नमूद केलेली असावी.

 व्यवसायासाठी लागणारी जागा, यंत्रसामग्री इत्यादी घेण्यासाठी बँकेकडून दीर्घकालीन कर्ज दिले जाते.

तसेच  बिजनेस प्लॅन मध्ये तुम्ही सुरू करू इच्छिणाऱ्या व्यवसायातून कसा नफा मिळवाल, व बँकेकडून घेतलेले कर्ज कसे परत फेड कराल, याची माहिती देणे आवश्यक आहे. तुम्ही दिलेला जो बिझनेस प्लॅन आहे किंवा तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याचा अभ्यास करून तुमच्या व्यवसायाबद्दलची पडताळणी करते व त्यानुसारच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते किंवा मंजूर केले जाते. दीर्घकालीन कर्ज हे ठराविक कालावधीपर्यंत दिले जाते. महिन्यांच्या हप्त्यानुसार त्याची परत फेड करावी लागते.

How To Get Bank Loan? नवीन व्यावसायिकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल. नव उद्योजकांना सरकारकडून अनुदानही मिळू शकते. तुमच्या व्यवसायातून जर इतरांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने शासन नवोद्योजकांना कर्ज देते, अनुदान देते. काही वेळा बँकेकडून दिले जाणारे दीर्घकालीन कर्ज हे तुमच्या खात्यात न देता यंत्रसामग्री देणारा यंत्र विक्रेता किंवा तुम्हाला अन्य गोष्टींचा पुरवठा करणारे पुरवठादार यांच्या खात्यात जमा केला जातो. म्हणजेच ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतले आहे तिथेच मिळालेल्या रकमेचा उपयोग होतो

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
  2. Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
  3. office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006
  4. Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
  5. Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top