Low Sand Rates स्वस्त दरात मिळणार रेती, घरकुलांना मिळणार गती……….!!

वाळू उत्खननासाठी चे नियम

अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या नवीन धोरणात काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यात 10 जून ते 30 सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी असेल आणि या कालावधीमध्ये वाळू उत्खनन करता येणार नाही.

वाळूचे उत्खनन सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या कालावधीतच करता येईल.

नदीपात्रात जास्तीत जास्त तीन मीटर इतक्या खोलीपर्यंत निविदा धारक किंवा ठेकेदार अस वाळूचे उत्खनन करता येईल.

रेल्वे किंवा रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूंना 600 मीटर अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. शासनाचे धोरण चांगले आहे, यामुळे नागरिकांना कमी दरात वाळू मिळणार आहे.

या आधी किती दराने वाळू विकावी, यावर काही नियंत्रण नव्हते. वाळू घाटातून वाळू काढली की ठेकेदार त्याला हव्या त्या किमतीला ती वाळू विकायचा. आता मात्र वाळू गटातून वाळू काढली की ती ठेकेदाराला थेट वाळू डेपोतच न्यावी लागेल. त्याला ती दुसरीकडे नेता येणार नाही. यामुळे वाळूवरील नियंत्रण वाढणार आहे.

याआधी वाळू घाटाचा लिलाव झाला की संबंधित परवानाधारक ती वाळू थेट ग्राहकांना विकत असत. अशावेळी वाळू अवाजवी दराने विकली जायची. यात एक प्रकारची एकाधिकारशाही निर्माण झाली होती. यातून वाळू माफिया तयार झाले होते. आता या प्रकाराला आळा बसेल.

नवीन धोरणानुसार वाळू गटाचे टेंडर निघते. उत्खननाच टेंडर मिळालेली व्यक्ती त्या गटातून वाळूचे उत्खनन करेल आणि ती वाळू त्या भागातल्या डेपोमध्ये पाठवली जाईल. या डेपोतूनच नागरिकांना ती वाळू घेता येईल. जवळपास सात हजार रुपये ब्रास न मिळणारी वाळू सहाशे रुपयांची पावती फाडून मिळत असेल, तर ते ग्राहकांच्या फायद्याचेच आहे.

वाळू गटापासून डेपोपर्यंत वाळू आणण्यावर महसूल विभागाला लक्ष केंद्रित करावे लागेल. तर वाळू गटापासून वाळू डेपो जवळच असणार आहेत. ते फार काही अंतरावर नसेल, यामुळे वाळू गटापासून वाळू डेपोपर्यंत होणारी वाहतूक आणि तेवढ्या मार्गवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top