Marriage Certificate विवाह नोंदणी प्रक्रिया | नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे |

Marriage Certificate विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. विवाह नोंदणी ज्ञापन ( नमुना ड) विवाह झाल्यापासुन ९० दिवासांचे आत निबंधक यांचेकडे समक्ष वधु-वराने स्वतः उपस्थित राहून सादर करणेचे आहे. तसेच ज्ञापनावरील तिन्ही साक्षीदार यांनीही निबंधक यांचे समक्ष उपस्थित राहून सह्या करणे आवश्यक आहे. तसेच विवाह ज्ञापनासोबत रू.१००/- मात्र चे कोर्ट फी स्टॅम्प जोडणे आवश्यक आहे.
  2. वधु आणि वर यांचे प्रत्येकी ०५-०५ पासपोर्ट साइज फोटो, तसेच ०३ साक्षीदारांचे प्रत्येकी ०२ पासपोर्ट साइज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
  3. वधु व वराची जाहीर निमंत्रण पत्रिका मुळ प्रत. पत्रिका नसेल तर त्याबाबत शपथपत्र सोबत जोडावे.
  4. संबंधित वधु-वराचा लग्न विधी समारंभ प्रसंगी वेळेचा एकत्रित फोटो.
  5. विवाह ज्या ठिकाणी झाला तेथिल विवाह पुरोहीत अगर विवाह विधी संपन्न करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाणपत्र किंवा ज्ञापनावर स्वाक्षरी तसेच मुस्लिम व्यक्तींच्या विवाहात काझी यांची माहिती व त्यांची स्वाक्षरी असावी. तसेच सोबत निकाहनाम्याची अटेस्टेड प्रत जोडावी. निकाहनामा जर उर्दू भाषेत असेल, तर त्याचे मराठी भाषांतर करून त्यावर संबंधित काझी यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत ज्ञापनासोबत जोडणे आवश्यक आहे.
  6. वधु-वर दोघांचे जन्म प्रमाणपत्र अगर शाळा सोडल्याबद्दलचा दाखला.
  7. यापूर्वी कोणत्याही कार्यालयात विवाह नोंदणी केली नसलेबाबतचे व विवाहासंबंधी खरी माहीती पुरवित असलेबाबतचे सक्षम अधिकारी यांचे समक्ष रू. १०० च्या स्टॅम्प पेपर वर कोर्टातून अॅफिड्यूट केलेले प्रतिज्ञापत्र.
  8. वधुवरांचे ओळख पटविणारे दस्तऐवज शासकिय कार्यालयाचे ओळखपत्र / बैंक पासबुक / पॅनकार्ड / आधारकार्ड / ड्रायव्हींग लायसन्स यापैकी एक स्वसाक्षांकित (सेल्फ ऑटस्टेड) सोबत जोडणे आवश्यक आहे.
  9. ज्ञापनावर साक्षीदार म्हणुन सहया करणा-या व्यक्तींनी आपले ओळखपत्र / बँक पासबुक / पॅनकार्ड / आधारकार्ड / ड्रायव्हींग लायसन्स यापैकी एक स्वसाक्षांकित (सेल्फ ॲटस्टेड) सत्यप्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
  10. विवाह प्रमाणपत्र एकदाच दिले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. ११. विवाह नोंदणी करणेबाबत वरील कागदपत्रे सादर केल्यावर खालील प्रमाणे आवश्यक फी या कार्यालयात भरुन त्याबद्दलची पावती करुन घेणे आवश्यक आहे.

विवाह नोंदणी शुल्काचा तपशिल खालीलप्रमाणे (सुधारीत शुल्क)(रू)

  1. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आतील नोंदणी:- ५०/-
  2. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतरच्या ९० दिवसांनंतर, परंतु १ वर्षे पुर्णहोण्यापूर्वी नोंदणी :- १००/-
  3. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतर एकवर्षाहून अधिक कालावधी झालेस विवाह नोंदणी :- २००/-
  4. विवाह नोंदणी अर्ज तपासण्यासाठी सोबत घ्यावयाचे शुल्क :- १५/-
  5. विवाह नोंदणीतील उताऱ्याची प्रमाणित प्रत मिळविणेसाठी अर्जासोबत घ्यावयाची शुल्क :- २०/-

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top