Mukhyamantri Ladki Bahin Yojana Application राज्य सरकार कडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. या साठी इच्छुक महिला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ही विनामूल्य राहणार आहे.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Application योजनेचा उद्देश :-
(१) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
(२ ) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
(३) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
(४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
(५) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Application पात्रताः-
(१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
(२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
(३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
(४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे.
(५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे:
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) रेशनकार्ड.
(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
कुठे करायचं अर्ज
ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी
शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.
अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Note: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज अजून सुरू झालेले नाही. फक्त ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.
अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Hi