Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये | मुख्यमंत्री : वयोश्री योजना |

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करणेकरिता, तसेच मनः स्वास्थ केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करुन घेणेकरीता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

हे वाचले का?  Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’ चा आधार | जाणून घेऊया काय आहे योजना |

अर्ज डाऊनलोड करुन सर्व सहपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह पोस्टाने/कुरीयर ने सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर / मुंबई उपनगर यांचे कार्यालयाकरीता खालील पत्यावर पाठविण्यात यावा.

नवीन प्रशासकीय इमारत, 4 था मजला, आर.सी.चेंबुरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400071.

https://tinyurl.com/yysnaxsj

Vidhwa Pension Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत विधवा महिलांना मिळणार दरमहा 600 रुपये | पहा आवश्यक कागदपत्रे | अर्ज कुठे करावा |

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष:

योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील जेष्ठ नागरीक, ज्या नागरिकांनी दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक, पात्र समजण्यात येतील.

यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल.

हे वाचले का?  Industry Department Schemes उद्योग विभागाच्या विविध योजना, बेरोजगारांना मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा….!!!

लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाखाच्या आत असावे.

राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स हे निकष अर्जदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड,
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र,
  • मतदान कार्ड,
  • राष्ट्रीयीकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स,
  • स्वयं-घोषणापत्र
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो,
  • मोबाइल क्रमांक,
  • शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य आवश्यक कागदपत्रे.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 लाभ काय मिळणार?

या योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांच्या शारीरिक असमर्थतता व दुर्बलतेनुसार उपकरणे खरेदी करता येतील.

यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना हप्ता होणार लवकरच जमा |

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा        

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top