Navasanjivani Yojana काय आहे नवसंजीवनी योजना? जाणून घ्या याची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये.

दाई बैठक :
गर्भवती मातांचे बाळंतपण हे सुरक्षित होणे, व  नवजात अर्भकांची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने उपकेंद्राच्या ठिकाणी परिसरातील प्रशिक्षित व अप्रशिक्षित दाइंची दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन या दाईंना प्रशिक्षित केले जाते.

आहार सुविधा व मंजुरी
आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे किंवा ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता भरती होण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून, सॅम व मॅम चे बाल रुग्ण व त्यांचे सोबत असलेल्या एका नातेवाईकाला दोन्ही वेळेचा आहार हा मोफत देण्यात येतो.

तसेच त्यांची मजुरी बुडीत म्हणून रु. 40 व प्रति बालक जेवणासाठी रु. 65 दररोज बालक भरती असेपर्यंत, देण्यात येते. हे अनुदान आदिवासी विकास विभागाकडून जिल्हा परिषदेकडे प्राप्त होत असतो .

मॉन्सून पूर्वीच्या उपायोजना :
पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बाळांचे मृत्यू प्रमाण व साथीचे रोग टाळण्याकरिता, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मे व जून महिन्यामध्ये वैद्यकीय पथके दुर्गम भाग येथे पाठवून, त्यांच्या मार्फत

प्रत्येक गावांमध्ये रुग्णांचे उपचार बालकांची तपासणी, व उपचार, लसीकरण सेवा, साथरोग प्रतिबंधक उपाय योजना व इतर आजारांचे सर्वेक्षण इत्यादी कामे करून घेतली जातात. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून देण्यात येत असते.

सेवा केंद्र
या योजनेअंतर्गत आदिवासी प्रवण क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आयुर्वेदिक दवाखाने या सर्व ठिकाणी रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. तसेच फिरत्या आरोग्य पथकामार्फत देखील आरोग्य सेवा दिली जाते.

तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुमच्या कमेंट्स द्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला दररोज वाचत रहा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा       

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top