Kanda Anudan Yojana कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने राज्य शासनाने कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
कांदा अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कांदा पिकाला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत होते, परंतु शासनाच्या कांदा अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कांदा अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे येथे पहा
Kanda Anudan Yojana कांदा अनुदान योजना कालावधी:
कांदा अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज करावे लागणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजारामध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेला आहे अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटल च्या मर्यादेत प्रति शेतकरी याप्रमाणे कांदा अनुदान योजनेमध्ये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
कांदा अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे येथे पहा
अर्ज कसा करावा?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान योजना सन 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र, तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.
कांदा अनुदान योजनेसाठी ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे या कृषी उत्पन्न बाजार समिती , खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्ती धारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचे कडे विहित वेळेत सादर करावेत.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
- तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?
- सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana
- पोलीस पाटील (Police Patil) यांना निवडणूक लढवता येते का ?
- विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी नुकसान ग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई
- विहीर सोलर पंप अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार सहा लाख अनुदान
- जमीन NA करण्याची गरज नाही (Jamin NA karnyachi garaj nahi).
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.