पशुसंवर्धन विभाग योजना: ७५% अनुदानावर गाय-म्हैस घ्या आणि कमवा लाखो रुपये |

पशुसंवर्धन विभाग योजना

पशुसंवर्धन विभाग योजना: पशुसंवर्धन विभागाकडून विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक लाभाच्या राज्य स्तरावरील तसेच जिल्हा स्तरावरील योजना या ऑनलाइन पद्धतीने राबविल्या जातात. २०२३-२०२४ या वर्षासाठी पशू संवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू झाले आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाट केले जाते.

काय आहे पशुसंवर्धन विभाग योजना:

राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवक तसेच शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणे यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून योजना राबविली जाते.

हे वाचले का?  Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!

या योजने अंतर्गत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ५०%अनुदान दिले जाते तर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना ७५% अनुदान दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखपत्र
  • फोटो
  • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • दारिद्रयरेषेचा दाखला
  • ७/१२ उतारा
  • ८ अ उतारा
  • ग्रामपंचायत नमुना नं ८
  • जातीचा दाखला
  • रेशनकार्ड
  • अपत्य दाखला
  • बचत गट सदस्य प्रमाणपत्र(असल्यास)
  • रोजगार कार्ड (असल्यास)

लाभार्थी निवड निकष:

  • सुशिक्षित बेरोजगार
  • अत्यल्प भूधारक(१ हेक्टर पर्यंत)
  • अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर)
  • महिला बचत गट
  • दारिद्रय रेषा

पशुसंवर्धन विभाग योजना ऑनलाइन अर्ज कुठे करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. महाबीएमएस या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून महिन्याच्या आत पात्र असलेल्या अर्जदारांना दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते. योजनेच्या अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या कॉल सेंटर क्रमांक १९६२ व १८००-२३३-०४१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे वाचले का?  मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार

कधी करता येणार अर्ज?

ऑनलाइन अर्ज करण्यास ९ नोव्हेंबर पासून सुरवात झाली असून ८ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top