How to take sample for soil testing असे तपासा जमिनीचे आरोग्य…… हे आहेत याचे फायदे…!!!

How to take sample for soil testing

How to take sample for soil testing शेतातील पिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, तसेच अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण जमिनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक औषधे तसेच यांत्रिकीकरणाचा वापर केला आहे. यामुळे आपल्या उत्पादनात वाढ तर झालीच आहे, पण रासायनिक खतांच्या केलेल्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचे आरोग्य ढासळत गेलेले आहे.

जमिनीचा पोत बिघडत गेला आणि त्यामुळे मातीची सुपीकता कमी झाली आहे. एखाद्यावेळी आपल्याला ऐकायला मिळत की ज्या शेतात पूर्वी एका एकरामध्ये दहा ते पंधरा क्विंटल एखाद्या पिकाचे उत्पादन निघायचे. त्याच ठिकाणी आता सहा ते आठ क्विंटल पिकाचे उत्पादन निघते. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

येथे क्लिक करून पहा मातीचा नमुना कसा घ्यायचा?

पिकाचे उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण म्हणजेच जमिनीची उत्पादकता कमी होणे हे आहे. यामुळे आता एक गरज निर्माण झाली आहे, की आपण आपल्या जमिनीचे आरोग्य तपासले पाहिजे. ज्या जमिनीत आपण पीक पिकवतो, त्या मातीत कोणती मूलद्रव्य किती प्रमाणात आहेत हे जाणून घेतले पाहिजे आणि त्यानुसार जमिनीतील मुलद्रव्यांचे प्रमाण संतुलित ठेवले पाहिजे. soil sampling pdf

आज आपण बघणार आहोत की जमिनीचे आरोग्य म्हणजे काय? माती परिक्षण करून जमिनीचे आरोग्य पत्रिका कशी काढायची? त्यासाठी मातीचे नमुने kसे घ्यायचे? याचे काय फायदे आहेत? याबाबतची सविस्तर माहिती बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.

हे वाचले का?  Pik Vima Update आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

हे आहेत जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे फायदे

जमिनीचे आरोग्य तपासणी म्हणजे नक्की काय असते?

जमिनीमध्ये असणारे मूलद्रव्य घटक आणि जमिनीचे गुणधर्म या गोष्टींवर जमिनीच्या आरोग्य अवलंबून असते. जमिनीमध्ये आढळणारी सेंद्रिय पदार्थ, खनिज द्रव्ये, पाणी आणि वायू हे घटक आपण पिकवलेल्या पिकांसाठी योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. जर तुमच्या जमिनीचे आरोग्य चांगले असेल तर त्या जमिनीमधून चांगल्या प्रमाणात उत्पादन घेता येते.

जमिनीत मुख्यत: नत्र, स्फुरद, पालाश ही अन्न द्रव्य आढळतात. तसेच कॅल्शियम, गंधक, मॅग्नेशियम यासारखी दुय्यम अन्नद्रव्य आढळतात. या व्यतिरिक्त लोह, तांबे, जस्त, बोरॉन आणि यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्य ही जमिनीत आढळतात. या सगळ्या अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण तपासणे, म्हणजेच माती परीक्षण करणे होय.soil testing procedure pdf

येथे क्लिक करून पहा मातीचा नमुना कसा घ्यायचा?

माती परीक्षण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीचा योग्य पद्धतीने नमुना घेणे.

How to take sample for soil testing प्रयोगशाळेत नमुना दिल्यानंतर काय होते?

ज्यावेळेस मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला जातो, त्यावेळेस तिथे त्याची नोंद केली जाते. शेतकऱ्यांनी हा नमुना कोणत्या घटकांच्या तपासणीसाठी पाठवला आहे, ते सांगणं महत्त्वाचं असतं. त्यानुसार माती तपासणीसाठी शुल्क आकारले जाते.

हे वाचले का?  Marriage Certificate विवाह नोंदणी प्रक्रिया | नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे |

साधारणपणे मातीचा नमुना ज्यामध्ये क्षारता, सामू, सेंद्रिय कर्ब, स्फुरद आणि पालाश या घटकांची तपासणी करायची असेल तर 35 रुपये एवढी फी आकारली जाते आणि तीस दिवसांमध्ये आरोग्य पत्रिका शेतकर्‍यांकडे दिली जाते.

विशेष मातीच्या नमुना ज्यामध्ये क्षारता, सेंद्रिय कर्ब, सामू, पालाश, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियमची आणि इतर बहुतेक गुणधर्माची तपासणी करायची असेल, तर त्यावेळेस 275 रुपये फी आकारले जाते आणि 45 दिवसांमध्ये शेतकर्‍याकडे आरोग्य पत्रिका दिली जाते.

हे आहेत जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे फायदे

जमिनीमध्ये लोह, जस्त, मंगल, तांबे यासारखे सूक्ष्म मूलद्रव्य यांची तपासणी करायची असेल, तर २०० रुपये ही आकारले जाते आणि पुढील 30 दिवसांमध्ये आरोग्य पत्रिका ही शेतकऱ्यांकडे दिली जाते.

कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मातीच्या नमुन्याला चाळणी द्वारे स्वच्छ केले जाते आणि मग ते प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले जाते. या नमुन्यातील वेगवेगळ्या घटकांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. त्यानुसार त्या घटकांचे प्रमाण मातीमध्ये कमी आहे किंवा जास्त आहे हे कॉम्प्युटरवर नोंदवल जात. आणि त्यानंतर ही माहिती आरोग्य पत्रिकेवर नोंद केली जाते. आणि ती पत्रिका शेतकऱ्याला देण्यात येते.

हे वाचले का?  Sim Card Update तुमचे जुने सिम कार्ड कोणी वापरत तर नाही ना..?

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “How to take sample for soil testing असे तपासा जमिनीचे आरोग्य…… हे आहेत याचे फायदे…!!!”

  1. Pingback: Loan Scheme केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे मिळणार अवघ्या 5% व्याजाने कर्ज | बघा काय आहे सरकारची योजना | -

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top