Shet Jamin Nakasha महाराष्ट्र सरकारच्या ई-नकाशा प्रकल्पाचा वापर करून ऑनलाईन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
तुम्हाला शेतजमिनीची हद्दी तपासायची आहे का? नवीन रस्ता काढायचा आहे का? किंवा जमिनीशी संबंधित अधिकृत माहिती पाहायची आहे का? यासाठी आता तलाठी कार्यालयाला जाऊन त्रास घेण्याची गरज नाही! महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी जमिनीचा डिजिटल नकाशा ऑनलाईन पाहता येण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Shet Jamin Nakasha कसा पाहाल ?
- ब्राउझरमध्ये जाऊन mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
- ‘Location’ या विभागातून राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा.
- तुमचा भाग ग्रामीण असल्यास ‘Rural’, शहरी असल्यास ‘Urban’ हा पर्याय निवडा.
- नंतर ‘Village Map’ वर क्लिक करा, तुमच्या गावाचा नकाशा स्क्रीनवर दिसेल.
- नकाशा झूम इन/आऊट करता येतो आणि फुल स्क्रीन मोडमध्ये पाहता येतो.
प्लॉट नकाशा (गट नकाशा) कसा मिळवाल?
- ‘Search by Plot Number’ हा पर्याय निवडा.
- सातबारा उताऱ्यावर असलेला गट क्रमांक टाका.
- त्या गटाचा नकाशा, शेतकऱ्यांची नावे आणि जमीन क्षेत्रफळ याची माहिती “Plot Info” मध्ये मिळेल.
- शेजारील गट क्रमांक आणि इतर माहितीही पाहता येईल.
जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? कोणती कागदपत्रे तपासून घ्यावी?
नकाशा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया:
- नकाशा पाहिल्यावर ‘Map Report’ वर क्लिक करा.
- नंतर उजव्या कोपऱ्यातून डाउनलोड चिन्हावर (↓) क्लिक करून PDF फॉर्मॅटमध्ये नकाशा डाउनलोड करा.
ई-नकाशा प्रकल्पाचा फायदा:
- जुने कागदी नकाशे डिजिटायझेशन करून ऑनलाईन करून देण्यात आले आहेत.
- यामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येते.
- जमिनीचा अधिकार सिद्ध करणे, कर्ज घेणे, फेंसिंगसाठी ऑनलाईन नकाशा खूप उपयुक्त ठरतो.
- नवीन पिढीच्या डिजिटल शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर आहे.
महाराष्ट्र सरकारच्या ई-नकाशा प्रकल्पामुळे आता घरबसल्या आणि सहजपणे तुमच्या जमिनीचा अधिकृत नकाशा (Shet Jamin Nakasha) पाहता व डाउनलोड करता येतो.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा