Sovereign Gold Bond Scheme सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (एसजीबी) म्हणजे काय ?
एसजीबी हे सरकारी प्रतिभूती असून त्याचे मूल्य ग्राम-सोन्यामध्ये असते. प्रत्यक्ष सोने ठेवण्यासाठीचा तो एक पर्याय आहे. निवेशनांना इश्युची किंमत रोख स्वरुपात द्यावी लागते आणि बाँड्स परिपक्व झाल्यावर त्यांचे विमोचनही रोखीनेच दिले जाते.
हे रोखे भारत सरकारच्या वतीने रिझर्व बँकेकडून दिले जातात.
सूचीबध्द वाणिज्य बँकांच्या वेबसाईट मार्फत ग्राहक ऑनलाईन अर्ज करु शकतो.
ऑनलाईन अर्ज करणारांसाठीची सुवर्ण रोख्यांची इश्यु किंमत, नाममात्र मूल्यापेक्षा प्रति ग्राम रु.50 ने कमी असेल आणि त्या अर्जाविरुध्दचे प्रदान डिजिटल रितीने केले जाते.
निवेशक प्रदान करत असलेल्या सोन्याचे आकारमान संचयित असते. आपण, विमोचन/मुदतपूर्व विमोचन करतेवेळी त्याला त्या सोन्याची, बाजारात प्रचलित असलेली किंमत/मूल्य मिळते.
प्रत्यक्ष स्वरुपात सोने ठेवण्याऐवजी एसजीबी अधिक चांगला पर्याय उपलब्ध करुन देतात.
सोने साठवून ठेवण्यामधील जोखमी व खर्च त्यामुळे होत नाही. परिपक्वतेच्या वेळी आणि नियतकालिकतेने व्याज देण्याचे वेळी असलेल्या भावाची हमी निवेशकांना दिली जाते. अलंकारांच्या स्वरुपात असलेल्या सोन्याच्या बाबतीत, घडणावळ व शुध्दता ह्या सारख्या प्रश्नांपासून एसजीबी मुक्त आहेत.
हे रोखे आरबीआयच्या पुस्तकात किंवा डिमॅट स्वरुपात धारण करता येतात व त्यामुळे स्क्रिप हरविण्यासारखे धोके संभवत नाहीत.
Sovereign Gold Bond Scheme एसजीबीमध्ये गुंतवणुक करण्यास कोण पात्र आहेत ?
विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 खाली व्याख्या केली असलेल्यानुसार भारतात निवासी असलेल्या व्यक्ती, एसजीबीमध्ये गुंतवणुक करण्यास पात्र आहेत.
अशा पात्र असलेल्या व्यक्तींमध्ये, व्यक्ती, एचयुएफ, ट्रस्ट, विश्वविद्यालये, धर्मादाय संस्था इत्यादि समाविष्ट आहेत.
निवासी दर्जामध्ये, निवासी पासून ते अनिवासी व्यक्ती असा बदल झालेले व्यक्तिगत गुंतवणुकदार, लवकर विमोचन करे पर्यंत/परिपक्वतेपर्यंत एसजीबी धारण करणे सुरु ठेवू शकतात.
केवायसीचे निकष
प्रत्येक अर्जासोबत, आय कर विभागाने गुंतवणुकदारांना दिलेला ‘पॅन क्रमांक’ दिला जाणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीसाठी कमाल व किमान मर्यादा कोणती ?
हे बाँड्स एक ग्राम सोने व त्याच्या पटीतील मूल्यात दिले जातात. व्यक्तींसाठी किमान गुंतवणुक मर्यादा एक ग्राम व वर्गणीसाठीची कमाल मर्यादा 4 किलो, हिंदु अविभाज्य कुटुंबासाठी (एचयुएफ) 4 किलो आणि प्रति वित्तीय वर्ष (एप्रिल – मार्च) सरकारने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या ट्रस्ट व त्यासारख्या संस्थांसाठी 20 किलो असेल.
संयुक्त धारणाबाबत, ही मर्यादा प्रथम धारकाला लागु आहे. वार्षिक मर्यादेमध्ये, सरकारने सुरुवातीच्या देण्यामधील निरनिराळ्या सोडतीखाली वर्गणी दिलेले बाँड्स व सेकंडरी मार्केटमधून खरेदी केलेले बाँड्स समाविष्ट असतील.
गुंतवणुकीवरील मर्यादेत, बँका व इतर वित्तीय संस्थांकडून तारण म्हणून असलेले धारण समाविष्ट असणार नाही.
व्याज दर काय आहे?
सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर, ह्या रोख्यांवर 2.50 टक्के (स्थिर दर) दरसाल व्याज दिले जाते.
हे व्याज सहामाही धर्तीवर निवेशकाच्या बँक खात्यात जमा केले जाईल आणि शेवटचे व्याज प्रदान, मुद्दलासह, परिपक्व झाल्यावर दिले जाईल.
एसजीबी विकणा-या प्राधिकृत एजन्सी कोणत्या ?
हे बाँड्स, राष्ट्रीयीकृत बँका, अधिसूचित खाजगी बँका, अधिसूचित विदेशी बँका ह्यांची कार्यालये किंवा शाखा, नेमस्त पोस्ट ऑफिसे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल) व प्राधिकृत स्टॉक एक्सचेंजेस कडून थेट किंवा त्यांच्या एजंटांकडून विकले जातात.
ग्राहकांना धारण प्रमाणपत्र केव्हा दिले जाईल ?
एसजीबी दिल्याच्या तारखेसच ग्राहकांना धारण प्रमाणपत्र दिले जाईल.
हे धारणपत्र, रोखे देणा-या बँका/एसएचसीआयएल कार्यालये/पोस्ट ऑफिसे/ स्टॉक एक्सचेंजेस /एजंट्स ह्यांच्याकडून गोळा केले जावे, किंवा अर्जामध्ये ई-मेल पत्ता दिला असल्यास, आरबीआयकडून ई-मेलवर थेट मिळविता येऊ शकते.
ह्या गुंतवणुकीतून बाहेर पडावयाचे असल्यास काय करावे ?
मुदतपूर्व विमोचनाच्या बाबतीत, निवेशकांनी कुपन रिपेमेंट डेटच्या तीस दिवस आधी, संबंधित बँक/एसएचसीआयएल कार्यालय/पोस्ट ऑफिस/एजंटकडे जावे.
मुदतपूर्व विमोचन करण्यासाठीची विनंती, तो निवेशक, कुपन पेमेंट तारखेच्या किमान एक दिवस आधी संबंधित बँक/पोस्ट ऑफिसात आल्यास मान्य केली जाईल.
विमोचनाचे उत्पन्न, बाँडसाठी अर्ज करताना ग्राहकाने दिलेल्या त्याच्या खात्यात जमा केले जाईल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.