Loan Prepayment कर्ज लवकर फेडायचे असेल, तर प्रीपेमेंट किती फायदेशीर?

Loan Prepayment

Loan Prepayment ज्यावेळी गृहकर्ज घेतले जाते त्या वेळी ते जवळपास 20-30 वर्षापर्यंत चालते. आपले कर्ज लवकरात लवकर फेडले जावे अशीच सगळ्या कर्जदारांची इच्छा असते. यासाठी अनेक वेळा गृहकर्ज प्रीपेमेंट च्या पर्यायाचा विचार केला जातो. गृहकर्ज प्रीपेमेंट चे अनेक फायदे आहे, परंतु नियोजनाच्या अभावामुळे त्याचे तोटेही सोसावे लागतात. या लेखात आपण गृहकर्ज प्रीपेमेंट चे फायदे आणि तोटे जाणून घेऊया. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?

ज्यावेळी आपण प्रत्येक महिन्याला ईएमआय भरतो. त्याव्यतिरिक्त जर बँकेत प्रीपेमेंट म्हणून एकरकमी रक्कम जमा केली तर ती रक्कम मूळ रकमेतून वजा केली जाते. याचा परिणाम म्हणून मूळ रक्कम कमी होते. कर्ज प्रीपेमेंट करून आपण कर्जाची रक्कम कमी करतोच शिवाय कर्जावरील व्याज पण वाचवतो. मूळ रक्कम कमी झाल्यामुळे ईएमआय देखील कमी होतो. असे केल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर देखील वाढतो. भविष्यामध्ये कर्ज घेण्याची गरज भासल्यास सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते.

हे वाचले का?  Income Tax Return For Housewife गृहिणीसुद्धा भरू शकतात आयटीआर | हे आहेत फायदे |

MJPJAY जाणून घेऊ या, काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना..?

Loan Prepayment प्रीपेमेंट करताना या गोष्टींचा विचार करा:

  • जे गृहकर्ज फ्लोटिंग रेटवर घेतलेले असते त्या गृहकर्जाच्या प्रीपेमेंट वर साधारणपणे कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. परंतू सावधगिरी म्हणून कर्जाचे प्रीपेमेंट करण्याआधी याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेकडून अटी व शर्ती समजून घ्या व नंतर च प्रीपेमेंट चा निर्णय घ्या.
  • गृहकर्जाच्या प्रीपेमेंट साठी इमर्जन्सी फंड चा वापर बिलकुल करू नका. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • जर तुम्ही गृहकर्जा व्यतिरिक्त कार लोन, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतलेले असेल तर गृहकर्जा व्यतिरिक्त जे दुसरे कर्ज आहे ते आधी बंद करा.
  • कारण इतर कर्जावरील व्याज हे गृह कर्जावरील व्याजापेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत गृहकर्जाचे प्रीपेमेंट करणे योग्य ठरत नाही.
हे वाचले का?  Rules for ITR हे आहेत आयटी रिटर्न साठी नियम?

Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!

  • गृहकर्ज हे साधारणपणे 20-30 वर्षांचे असते. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काळात प्रीपेमेंट केले तर तुमचे लाखो रूपयांचे व्याज वाचू शकते. याचा परिणाम म्हणून तुमचा ईएमआय कमी होईल.
  • जर तुम्ही उशिरा प्रीपेमेंट चा निर्णय घेत असाल तर अशावेळी तुमच्याकडे असलेला पैसा इतर ठिकाणी गुंतवा. गृहकर्ज वेळेआधी फेडणे अधिक फायद्याचे ठरते.
  • तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदार्‍या लक्षात ठेवून गृहकर्ज प्रीपेमेंट चा निर्णय घेणे फायदेशीर राहील.
  • जर तुम्ही तुमची एफडी किंवा इतर पॉलिसी चे पैसे वापरून लोन प्रीपेमेंट करणार असाल तर ते योग्य ठरणार नाही.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  SIP म्हणजे काय? एस आय पी मध्ये गुंतणूक करण्याची प्रक्रीया |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top