Student Insurance विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाकडून अनेक निर्णय घेतले जातात. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यामधील अकृषी विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “ऐच्छिक स्वरुपाची” विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा (Personal Accident Insurance ) तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance ) योजना लागू करण्यात आली आहे. यासाठीचा शासन निर्णय 16 ऑक्टोबर, 2023 रोजी जारी करण्यात आला आहे
अधिकृत शासन निर्णय: येथे क्लिक करा
शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येणार आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
- 62 रुपयांत 5 लाख रुपयांचा अपघात विमा:
- अपघात विमा योजना ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 62 रुपयांमध्ये 5 लाख रुपयांचा अपघात विमा काढता येणार आहे.
- 20 रुपयांत 1 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा:
- अवघ्या 20 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा काढता येणार आहे. ICICI Lombard या विमा कंपनी द्वारे विद्यार्थ्यांना हा विमा असणार आहे.
- 422 रुपयांमध्ये मिळणार वैद्यकीय विमा:
- जारी विद्यार्थ्यांकडे स्वत:चा अपघात विमा असेल तरी सुद्धा विद्यार्थ्यांना 422 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा काढता येणार आहे.
Student Insurance कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?
विद्यापीठ किंवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेज मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतच्या अभ्यासक्रमाला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, असे विद्यार्थी या योजनेस पात्र ठरतात. ही योजना ऐच्छिक आहे, त्यामुळे सर्वांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे बंधन नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- जन्मतारीख अथवा बोर्ड प्रमाणपत्र फोटो
- महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे ओळखपत्र
- प्राचार्यांच्या स्वाक्षरि सोबत शिक्का
- गुणपत्रिका
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.