ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी सुविधा मिळणार निवडणूक आयोगाचा निर्णय.

राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल,

राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री.मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी ॲपच्या माध्यमातून विविध सुविधांसह मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. त्यात आता मतदार नोंदणीच्या सुविधेचीही भर घालण्यात आली आहे.

त्यातून भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार नोंदणी होईल. मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतही दुरूस्ती करता येईल.

हे वाचले का?  DP Transformer टॉवर शेतात असेल तर मिळतो मोबदला GR

भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे.

या कार्यक्रमानंतर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याच मतदार याद्या 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावित किंवा नावांत अथवा पत्त्यांत बदल असल्यास तोही करावा, असे आवाहन श्री. मदान यांनी केले.

हे वाचले का?

हे वाचले का?  DOT India Recruitment दूरसंचार विभागा अंतर्गत 270 जगासाठी भरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top