Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana घरकुलासाठी मिळणार 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान | असा करा अर्ज |

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana समाज कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली जाते.

या योजनेचा लाभ हा भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबांना दिला जातो.

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana योजनेचा उद्देश:-

  1.  विमुक्त जाती व भटक्या जमातीचा विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे. त्यांचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्न स्त्रोत वाढावे , त्यांना स्थिरता प्राप्त करून देणे.
  2.  यासाठी त्यांना जमिन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देणे व त्या ठिकाणी त्यांना आर्थिकद्रष्टया स्वयंपूर्ण बनविणे.

येथे पहा लाभाचे स्वरूप, पात्रता निकष

योजनेच्या अटी:-

१) या योजनेंतर्गत लाभार्थी कुटूंबाना मिळणारा भूखंड व त्यावरील घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल. मात्र विधवा व परितक्त्या स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील.

हे वाचले का?  One Farmer One Transformer scheme एक शेतकरी एक डीपी योजना...

२) या योजनेंतर्गत मिळालेला भूखंड व त्यावरील घर लाभार्थी कुटूंबास कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करता येणार नाही. तसेच भूखंड व घर कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाही.

३) या योजनेचा लाभ कुटूंबातील एकाच कायदेशिर व्यक्तीस देण्यात येईल.

४) भूखंडावरील जागेचा वापर हा भाडे तत्त्वावर अन्य व्यक्ती/ कुटूंबास देता येणार नाही. तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही, तसेच विकता येणार नाही. तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करण्यात येईल व मंजूर केलेल्या निधीची वसूली केली जाईल.

५) प्रस्तुत घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणारी वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी लाभार्थ्यांने भरणे आवश्यक राहील व घराचे देखभाल व दुरुस्ती ही लाभार्थ्यांने स्वतः करावयाची आहे.

हे वाचले का?  Divyang Loan दिव्यांग व्यक्तींना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज | पात्रता | आवश्यक कागदपत्रे | अर्ज कसा करावा |

येथे पहा लाभाचे स्वरूप, पात्रता निकष

आवश्यक कागदपत्रे

१) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र.

२ ) कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १ लक्ष पेक्षा कमी असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र

३) भूमिहीन असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र..

(४) महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र

५) कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबद्दलचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top