Bank Account Zero Balance एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर अनेकजण ऑनलाइन बिल भरतात. जेव्हा पासून आपल्या देशात ऑनलाइन पेमेंट ची सुविधा उपलब्ध झाली आहे तेव्हापासून अनेक लोक आपल्या सोबत कॅश ठेवत नाही. ऑनलाइन पेमेंट मुळे कोणत्याही ठिकाणी खरेदी केल्यानंतर किंवा इतर बिल भरावयाचे असल्यास ते अगदी सहजपणे भरता येते. आपल्या देशात 35 कोटी लोक हे यूपीआय पेमेंट चा वापर करतात.
यूपीआय पेमेंट ची संख्या दिवसेंदिवस वाढत च आहे. पण जर तुमच्या बँक खात्यावर झिरो बॅलन्स असेल तर तुम्हाला खरेदी वेळी ऑनलाइन पेमेंट करताना अडचण येऊ शकते. यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन यूपीआयने क्रेडिट लाइन सुविधा सुरू केली आहे.
Credit Card Information जाणून घेऊया क्रेडिट कार्ड चे फायदे-तोटे ..!
Bank Account Zero Balance बॅलन्स चेक करण्याची आवश्यकता नाही
यूपीआय वापरकर्त्यांना कोणतेही पेमेंट करण्याआधी आपल्या बँक खात्यात किती पैसे आहे हे तपासून घ्यावे लागत होते. परंतु, यूपीआयने सुरू केलेल्या क्रेडिट लाइन सुविधेमुळे यूपीआय वापरकर्त्यांना आपला बँक बॅलन्स चेक न करता बिनधास्त खरेदी करता येणार आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या वतीने ग्लोबल फीनटेक फेस्टमध्ये यूपीआय वर या सुविधेची घोषणा करण्यात आली. ही सुविधा सध्या काही बँक आणि यूपीआय ॲप्स वर दिली जात आहे.
Pre Sanctioned credit line सेवा सेव्हिंग अकाऊंट, प्रिपेड वॉलेट, ओव्हर ड्राफ्ट अकाऊंट, रुपे क्रेडिट कार्ड आणि यूपीआय सिस्टम सोबत लिंक करता येणार आहे.
Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!
नवीन फीचर मुळे लोकप्रियता कायम:
2016 मध्ये यूपीआय ची सुरुवात झाली होती. यूपीआय चा वापर करून पेमेंट करण्यासाठी बँक अकाऊंट नंबर, मोबाईल नंबर, यूपीआय आयडी किंवा यूपीआय क्यु आर कोडे ची आवश्यकता असते.
यूपीआय द्वारे व्यवहार करताना प्रत्येक वेळी बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता भासत नाही.
Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
यूपीआय चा लाभ ग्राहकांना 24 तास कधीही घेता येतो. यूपीआय पेमेंट करताना ग्राहकांना काही प्रॉब्लेम आल्यास 24*7 एक हेल्पलाइन नंबर देलेला असतो.
नवनवीन फीचर्स मुळे यूपीआय ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत च् आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.
- Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |
- Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |
- UMED महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ‘उमेद’ अभियान
- Annasaheb Patil Mahamandal Loan आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसहाय्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ..
- CMEGP scheme राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा