केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.
बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
केंद्रपुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान अंतर्गत असणारी बियाणे व प्रक्रिया साठवण केंद्र उभारणी ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.
राज्यात या प्रकल्पासाठी 50 प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले होते. महत्त्वाच्या पिकांचे क्षेत्र लक्षात घेऊन लक्षांक निर्धारित करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने एकूण 48 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी 42 प्रस्ताव पात्र ठरले. उर्वरित पैकी चार रद्द तर दोन अपात्र ठरवण्यात आले. आजमितीस एकूण 16 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याशिवाय, सन 2021-22 मध्ये एकूण 10 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
अधिकाधिक चांगल्या संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील, यासाठी जिल्हा स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश कृषीमंत्री श्री.भुसे त्यांनी दिले.
नव नवीन माहिती
- Land dispute court procedure जमीन वाद कोर्टात गेल्यावर काय होते? संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया, खर्च आणि किती वेळ लागतो – सविस्तर माहिती
- Post Office MIS Scheme पोस्ट ऑफिस MIS योजना 2026: पत्नीबरोबर गुंतवणूक करा आणि दरमहा ₹9,250 निश्चित व्याज मिळवा
- Ladki Bahin January Installment लाडकी बहीण योजनेचा मोठा अपडेट! जानेवारीचा हप्ता मिळणार का? निवडणूक आयोगाचा स्पष्ट निर्णय
मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीस कृषि विभागाचे सहसचिव गणेश पाटील, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, उमेश चांदवडे उपस्थित होते.
हे वाचले का?
- सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार.
- बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?
- कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?
- हक्कसोड पत्र म्हणजे काय ? Hakka Sod Patra Mhanje Kay?
- आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

