बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

RBI तक्रार प्रणाली बाबत माहिती

सामान्य नागरीक असो किंवा बँक खते धारक जेव्हा कोणत्याही बँकेत जातो तेव्हा तेथे येणारे अनुभव हे जास्तीत जास्त वाईटच असतात हाच सर्व सामान्य नागरीकांचा नियमित अनुभव झाला आहे.

पण जेव्हा आपल्याला असा अनुभव येतो तेव्हा आपण अश्या मुजोर बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी? (How to file complaints against banks on RBI website) याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या वेबसाईटवर तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) तयार केली आहे. या वेबसाईटवर आपण सर्व वित्तीय सेवा देणाऱ्यांन विरूद्ध तक्रारी दाखल करू शकता.

जसे की बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs), बँक अधिकारी यांची तक्रार, (How to file complaints against banks on RBI website) ज्या केंद्रीय बँकेद्वारे नियंत्रित केल्या जातात अशा वित्तीय संस्था.

“तक्रारींच्या स्थितीचा मागोवा/ पाठपुरावा घेण्यासाठी RBI ने एक Interactive Vice Response इंटरएक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स (IVR) प्रणाली वापर करणारी वेबसाईट तयार केली आहे. तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS).

CMS सुरू केल्यावर, रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल आणि ग्राहक शिक्षण आणि संरक्षण सेल (Ombudsman and Consumer Education and Protection Cells (CEPCs)) च्या कार्यालयांमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींची डिजिटल स्वरुपात कारवाई केली जाणार आहे. “

बँकिंग ग्राहकांच्या तक्रारींचे जलद गतीने निराकरण करणे हे या वेबसाईट चे उद्दीष्ट आहे, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे अ मुळे ग्राहकांचा बहुमूल्य वेळ आणी मनस्ताप वाचणार आहे.

हे वाचले का?  Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना हप्ता होणार लवकरच जमा |

कोणत्याही बॅंकेला लंच टाईम नसतो | RTI मधुन बाहेर आलेले सत्य

बँक अधिकारी यांची तक्रार कशी दाखल करावी

उदा. तुम्हाला सर्व प्रथम भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉगिंग करावे लागेल. त्या नंतर तुमची माहिती खालील प्रमाणे भरावी लागेल. यामध्ये तुमचे नाव पत्ता मोबाइल नंबर इ. तक्रार दाखल करत आहात त्याचे संपूर्ण तपशील द्यावे लागतील.

त्याच बरोबर बँक किंवा तुम्ही ज्या संस्था, व्यक्तीविरूद्ध तक्रार करायची आहे त्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. ही माहिती भरत असताना तुम्हाला रेडी मेड नमुने दिसतील त्यामधील पर्याय आपल्याला निवडायचे आहे. चला तर स्टेप बाय स्टेप समजून घेऊया.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay)

Step 1-

तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला https://cms.rbi.org.in वेबसाईट जावे लागेल. या नंतर आपण भाषा या पर्यायावर क्लिक करून आपली भाषा English किंवा हिन्दी या पैकी पर्याय निवडू शकता त्यानंतर, तक्रार करण्यासाठी तक्रार (Complaint ) वर क्लिक करा.

बँक अधिकारी यांची तक्रार कशी दाखल करावी
बँक अधिकारी यांची तक्रार कशी दाखल करावी

Step 2-

तक्रार करण्यासाठी तक्रार (Complaint ) वर क्लिक केल्या नंतर ‘ज्या घटका विरोधात बँकिंग लोकपालाकडे तक्रार करावयाची आहे तो पर्याय निवडा ड्रॉपडाउन सूची मधून, आवश्यक पर्याय निवडक – बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs), ज्या केंद्रीय बँकेद्वारे नियंत्रित केल्या जातात अशा वित्तीय संस्था. त्या नंतर त्या नंतर तुमची माहिती खालील प्रमाणे भरावी लागेल. यामध्ये तुमचे नाव मोबाइल नंबर इ.

हे वाचले का?  Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर....

संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar) अनुदान योजना

Step 3-

त्या नंतर महाराष्ट्रातील तक्रारी करता बीओ क्षेत्र हे बीओ मुंबई 2 हे निवाडा

image 2

Step 4-

त्या नंतर राज्य, जिल्हा, व आपली बँक निवडावी. त्या नंतर आपल्या बँकेची ब्रांच निवडावी ही माहिती भरल्या मुळे आपल्या तक्रारीवर कारवाई करणे सोपे जाते.

image 3

Step 5-

जर आपण या अगोदर कोणत्याही न्यायिक मंच/लवादासमोर तक्रार प्रलंबित आहे का? असल्यास योग्या तो पर्याय निवडावा. त्या नंतर खालील पर्याय दिसतील यात जर आपण या अगोदर बँकेत तक्रार केली असेल तर त्याचा तपशील भरावा.

जर आपण या अगोदर बँकेत तक्रार केली नसेल तर आपण या वेबसाईट तक्रार करू शकणार नाही. त्यामुळे आपण अगोदर बँकेत लेखी तक्रार करून पोहच घ्यावी म्हणजे पुढे पाठपुरावा करणे सोपे जाते.

image 5

Step 6-

अगोदर बँकेत तक्रार केली तर त्याचा तपशील तारीख, आपल्याला मिळले उत्तर असल्यास नसल्यास त्याचा तपशील नोंद करावा, तक्रार स्वरूपा नुसार योग्य ते सर्व पर्याय निवडावे. अधिक माहिती करता video पहावा.

image 6

Step 7-

या नंतर तुमची माहिती खालील प्रमाणे भरावी लागेल. यामध्ये तुमचे नाव पत्ता मोबाइल नंबर इ. माहिती भरावी. त्या नंतर येणारे पर्याय निवडून माहिती ऑटो भरली जाईल.

image 7

Step 8-

या मध्ये बँक खात्याचा तपशील भरावा.

image 8

Step 9-

बँकेत तक्रार केली तर त्याचा तपशील तारीख, अकाऊंट मधून रक्कम कमी झाली असेल तर ती नोंदवावी.

हे वाचले का?  Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद
image 9

Step 10-

त्या नंतर घोषणा पत्र भरावे.

image 10

Step 11-

नॉमिनेशन: तक्रारदाराने आपल्या प्रतिनिधीला बँकिंग लोकपाल किंवा बँकिंग लोकपालाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी आणि सादर करण्यासाठी नामांकित करण्याची इच्छा असल्यास सदरील व्यक्तीचा तपशील: भरावा.

image 11

Step 12-

तक्रारीशी संबंधित तपशील, काही असल्यास ती माहिती अपलोड करावी व सबमीट वर क्लिक करावे.

image 13

Step 13-

तक्रारीशी संबंधित तपशील, काही असल्यास ती माहिती अपलोड करावी

image 14
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top