हक्कसोड पत्र म्हणजे काय ?
हक्कसोड पत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने किंवा सहहिस्सेदाराने त्यांच्या वैयक्तिक हिस्स्याच्या असलेल्या मिळकतीवर हक्क त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्या लाभात स्वेच्छेने किंवा कायमस्वरूपी सोडून दिल्याचा नोंदणीकृत दस्त.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
हक्क सोडपत्र कोण करू शकतो ?
हक्कसोड पत्र हे एकत्र कुटुंबाचा सदस्य, मग तो स्त्री असो व पुरुष किंवा सहहिस्सेदार कोणीही करू शकतो. एकत्र कुटुंबाचा सदस्य, मग तो स्त्री असो व पुरुष किंवा सहहिस्सेदार फक्त वारसा हक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतील स्वतःच्या हिस्स्याच्या मिळकत हक्कसोड पत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करू शकतो.
200 ₹ मधे जमीन वाटप कशी करावी No Stamp Duty
कोणत्या मिळकतीचे हक्क सोड पत्र होऊ शकते ?
हक्क सोड पत्र हे फक्त वारसाहक्काने किंवा वारसाधिकाराने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील त्याच्या हिस्स्याच्या मिळकतीच्या संबंधात होऊ शकते.
हक्कसोड पत्र हे कोणाच्या लाभात होऊ शकते ?
हक्क सोड पत्र हे फक्त कुटुंबाचे सदस्य / सहदायक असलेल्या सभासदाच्या लाभात होऊ शकते. कुटुंबाचे सदस्य नसल्याचे त्याच्या लाभात हक्क सोड करायचे असल्यास ते मिळकतीचे हस्तांतरण पकडले जाऊ शकते व त्यास मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदीनुसार मुल्यांकनावर खरेदिखता प्रमाणे मुद्रांक भरणे आवश्यक ठरते.
हकसोड पत्र व मोबदला
हक्कसोड पत्र हे सर्वसाधारणपणे विनामोबदला असते. मात्र ते मोबदल्या सहित ही असू शकते व ते एकत्रित कुटुंबाच्या सहदायकाच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक भरण्याची गरज नसते, मात्र त्यास नोंदणीची आवश्यकता असते, तरीही त्यास २०० रुपयांचे मुद्रांक व तेवढीच नोंदणी फी लागते.
हक्कसोड पत्र व नोंदणी
हक्कसोड पत्राची नोंदणी हि आवश्यक असते अन्यथा त्याची नोंद सरकारी दफ्तरी होत नाही. कायद्याने हक सोड पत्र हे तोंडी किंवा लेखी असू शकते. मात्र तोंडी हक्कसोड सिद्ध होणे शक्य होत नाही. म्हणून ते लेखी होणे आवश्यक असते, मात्र ते लेखी असल्यास त्यास नोंदणीची आवश्यकता असते. हक्कसोड म्हणजे दान / बक्षीस पत्र हक्कसोड पत्रामुळे हक्काचे हस्तांतरण होते. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ कलम १२३ अन्वये असे हस्तांतरण नोंदणीकृत करणे आवश्यक असते. नोंदणी अधिनियम १९०८ कलम १७ अन्वये स्थावर मालमत्तेचे दान लेख यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
हक्कसोड पत्र म्हणजे काय, हक्कसोडपत्र बाबत व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हक्कसोड कार्यपद्धत
हक्क सोड पत्र हे लिहून देणार यांनी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तिकरीत्या सर्वांनी मिळून कुटुंबाच्या कोण्याही एका सदस्याच्या लाभात किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात करून ठेवता येते. हक्क सोड पत्राचा दस्त हा जाणकार वकिलांकडून करून घेणे अभिप्रेत असते. दस्त रक्कम रु.२००/- च्या (अद्ययावत तरतूद पहावी) मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. दस्तात पुढील विवरणे आवश्यक आहेत.
- लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा व तपशील.
- लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा व तपशील.
- एकत्र कुटुंबाच्या हिस्याप्रमाणे काही किंवा संपूर्ण मिळकतीचे वर्णन.
- एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांचा व त्यातील सदस्यांचा तपशील,
- दस्ताचे निष्पादन व साक्ष,
- दस्तास आवश्यक मुद्रांक,
- दस्ताची नोंदणी.
- हक्कसोड पत्र स्वतःच्या हिस्याच्या सर्व किंवा काही मिळकतीवर करता येते. हक्कसोड पत्र स्वतःच्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबतीत आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वतःच्या हिस्याच्या कोणत्या मिळकतीं बाबतीत हक्कसोड पत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोड पत्रात असावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण येणार नाही.
नवनविन माहिती
- Cabinet Decisions Today मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय
- Gopinath Munde Sanugrah Anudan गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना
- Free Fortified Rice मोदी सरकारची मोठी घोषणा | डिसेंबर 2028 पर्यंत सुरू राहणार तांदळाचा मोफत पुरवठा |
- krishi swavalamban yojana डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ
- PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 3000 महिना पेन्शन
हक्क सोड पत्र कधी करता येते ?
हकसोड पत्र हे कधीही करता येते, त्यास मुदतीच्या कायद्याचा अडसर येत नाही. हक सोड पत्रासाठी ७ / १२ किंवा मिळकत पत्रिकेवर कुटुंबाचे सदस्याचे नाव दाखल असेलच याची आवश्यकता नाही. खरेतर हक्क सोड पत्र ७/१२ किंवा मिळकत पत्रिकेवर नाव दाखल करण्या पूर्वीही करता येते म्हणजे त्याप्रमाणे महसूल खात्यास योग्य त्या नोंदी घेणे सोपे पड़ते.
हक्कसोडपत्र दस्त नोंदणी नंतर सदर दस्त नोंदणीनंतर दस्ताची मूळप्रत लगेच ताब्यात घ्यावी. नोंदणीनंतर मूळ दस्त, मूळ नोंदणी पावती व मूळ सूची क्र. २ ही ताब्यात घ्यावी व पुढील हक्क नोंदणीसाठी संबंधित तलाठ्याकडे पाठवावीत.
सदर दस्त व सूची क्र.२ नुसार तलाठी / नगर भूमापन अधिकारी ६४ फेरफाराला नोंद घेतात. सर्वांना नोटीसा बजावतात व त्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत कोणाचीही तक्रार नसल्यासच मंडळ अधिकारी द्वारानोंद मंजूर करून हक्क लाभदारांची नावे ७/१२ वर दुरुस्त केली जातात.
हे वाचले का?
- तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.
- शेळी पालन अनुदान मध्ये घसघशीत वाढ
- मंडल निरीक्षक सर्कल (Circle) यांची भाऊसाहेब कर्तव्ये.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हक्कसोड पत्र म्हणजे काय, हक्कसोडपत्र बाबत व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
फार सुंदर माहिती दिली हि बाबा माहित नसल्याने बरेच लोक फसले जातात .
हक्क सोड प्रमाणापत्र online कारवाई करता येते का? हे प्रमाण पत्र कूठे रजिस्टर करावे लागते?
Online होत नाही एजंट च्या माध्यमातून हक्क सोड रजिस्टर करावे लागते.
कारण पैसे कसे मिळणार? तो मुख्य महसूल आहे अजून…. लोकशाही मध्ये…
हक्कासोड नंतर कर पावती, पाणी बिल, वीज बिल नवावर होते का?