दिनांक १७ मे, २०२१ रोजी “तौक्ते” चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील किनारपट्टींच्या व इतर काही जिल्हयांमध्ये बसला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी / राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या दरामध्ये सदर घटनेसाठी “निसर्ग” चक्रीवादळामध्ये देण्यात आलेल्या दरानुसार “तोक्ते” चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या दि.२७.०५.२०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार “तौक्ते” चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत खाली प्रमाणे मदत मिळणार आहे.
सदर मदतीची रक्कम प्रदान खालील अटी व शर्ती लागू
राहतील.
१. पूर्वी रोजगार हमी योजनेखाली जशी फळबाग योजना लागू होती त्याच धर्तीवर सचिव, जलसंधारण व रोजगार हमी योजना यांनी योजना कार्यान्वित करणेबाबत कार्यवाही करावी.
२. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना संदर्भाधीन दिनाक २६.०८.२०२० व्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय करण्यात आल्याप्रमाणे मोफत अन्न धान्य व केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात येत आहे..
हे ही वाचा
- ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!
- ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- “ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार.
३. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या मनुष्यांच्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून रु.४.०० लक्ष इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अतिरिक्त रू.१.०० लक्ष इतकी मदत देण्यात यावी, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सविस्तर तपशीलासह प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठवावा.
४. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधील विहित दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाच्या वाढीव मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीतून खर्च करण्यात यावी.
५. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी.
लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा.
GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube